

Protein powder safety alert :
नवी दिल्ली : जगभरात मागील दोन दशकांपासून प्रोटीन पावडरचा वापर केवळ बॉडीबिल्डिंग (शरीरसौष्ठव) आणि फिटनेससाठी नव्हे तर सामान्य पोषण, वजन वाढविणे यासाठी केला जातो. मात्र आता कन्झ्युमर रिपोर्ट्सने केलेल्या चाचणीनुसार, लोकप्रिय प्रोटीन पावडर आणि शेकमध्ये अतिरिक्त प्रमणात शिसे असल्याचे दिसून आले आहे. तज्ज्ञांनी त्यांच्या सेवन मर्यादित प्रमात करावे, असा सल्ला दिला आहे.
न्यू यॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कन्झ्युमर रिपोर्ट्सच्या ताज्या तपासणीत, संशोधकांनी मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणाऱ्या प्रोटीन पावडर आणि रेडी-टू-ड्रिंक प्रोटीन शेकचे विश्लेषण केले. १४ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या या निष्कर्षांनुसार, काही प्रोटीन पावडरमध्ये शिसेचे प्रमाण इतके जास्त आहे की त्यांचे सेवन टाळण्याचा किंवा मर्यादित ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. या अहवालात असे नमूद केले आहे की, तपासणी केलेल्या २३ प्रोटीन पावडर आणि शेकपैकी दोन-तृतीयांशहून अधिक उत्पादनांच्या एका सर्व्हिंगमध्ये कन्झ्युमर रिपोर्ट्सच्या अन्न सुरक्षा तज्ज्ञांनी एका दिवसात सुरक्षित मानलेल्या प्रमाणापेक्षा जास्त शिसे होते. तर काही प्रकरणांमध्ये हे प्रमाण मर्यादेच्या १० पटीने अधिक होते.
वनस्पती माती, पाणी आणि हवेतून नैसर्गिकरित्या पोषक तत्वांसह दूषित घटकही शोषून घेतात. जड धातू नैसर्गिक स्त्रोतांकडून (जमीन) किंवा मानवनिर्मित औद्योगिक प्रदूषण, कीटकनाशकांचा वापर, रस्त्यावरील धूळ किंवा सांडपाण्याचे सिंचन या माध्यमातून येते. प्राण्यांमध्ये जड धातू सामान्यतः दूषित चारा, माती, पाणी किंवा हवेद्वारे अन्नसाखळीत प्रवेश करतात. कन्झ्युमर रिपोर्ट्सने २३ प्रोटीन सप्लिमेंट्सची (यात दुग्धजन्य, गोमांस आणि वनस्पती-आधारित पावडर व रेडी-टू-ड्रिंक शेकचा समावेश आहे) चाचणी केली. प्रत्येक उत्पादनाचे एकाधिक नमुने तीन महिन्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या किरकोळ विक्रेत्यांकडून खरेदी करण्यात आले. यामध्ये प्रोटीन पावडरमध्ये शिसे प्रमाण अतिरिक्त असल्याचेस्पष्ट झाले. सुमारे ७०% उत्पादने दररोजच्या शिफारस केलेल्या ०.५ मायक्रोग्राम मर्यादेच्या १२०% पेक्षा जास्त होती. तीन उत्पादनांमध्ये कॅडमियम आणि अजैविक आर्सेनिक (एक विषारी धातू जो ज्ञात कर्करोगकारक म्हणून वर्गीकृत आहे) चे प्रमाण देखील सुरक्षित पातळी ओलांडली होती.
हे निष्कर्ष चिंताजनक आहेत कारण अशा प्रकारच्या प्रोटीन पावडरच्यासेवनाने मुलांच्या मेंदूला नुकसान होण्याचा धोका आहे. तर प्रौढांमध्ये उच्च रक्तदाब, मज्जातंतूंचे नुकसान, मूत्रपिंडाच्या समस्या आणि पुनरुत्पादक समस्यांना कारणीभूत ठरू शकतो. आर्सेनिक आणि कॅडमियमची वाढलेली पातळी कोणत्याही वयात कर्करोगाच्या वाढीव जोखमीशी संबंधित असल्याचेही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच कोणती उत्पादन टाळावी, याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
तुम्ही शिसेचा संपर्क शक्य तितका कमी ठेवू इच्छिता, त्यामुळे या निष्कर्षांवर आधारित, कन्झ्युमर रिपोर्ट्सने टाळण्यासाठी सूचीबद्ध केलेल्या दोन उत्पादनांचा (Naked Nutrition’s Vegan Mass Gainer आणि Huel’s Black Edition) वापर करणे थांबवणे योग्य ठरू शकते. प्रोटीन पावडच्या कव्हरवरलवर Prop 65 इशारा असलेले कोणतेही उत्पादन टाळणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. तसेच प्रोटीन पावडर ऐवजी तुमच्या प्रथिनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, ताजे, संपूर्ण अन्न नैसर्गिकरित्या प्रथिने असणार्या चिकन, मासे, टोफू, मसूर, अंडी, ग्रीक दही, पातळ गोमांस आणि बीन्स यांचा आहारात समावेश करावा, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.