Protein Diet Tips : बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी प्रोटीन आवश्यक, आहारात कसे वाढवाल?

पुढारी वृत्तसेवा

पोषक आहारासाठी जागरूकता पसरवण्यासाठी राष्ट्रीय पोषण सप्ताह नुकताच साजरा झाला.

Canva

WHO आणि ICMR मते निरोगी प्रौढांसाठी दररोज प्रति किलो वजनानुसार ०.८–१.० ग्रॅम प्रोटीनचा आहारात समावेश असावा.

Canva

प्रथिने फक्त खेळाडूंसाठी नसतात. तर किशोरवयीन मुलांसह प्रौढ आणि वृद्धांसाठीही आवश्यक आहेत.

Canva

एका सर्वेक्षणात आढळले आहे की, सुमारे ७०% भारतीय प्रथिनांच्या गरजेपेक्षा कमी प्रथिने घेतात.

Canva

आहारात प्रोटीनच्‍या कमतरतेमुळे थकवा, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, केस गळणे आणि स्नायू कमकुवत होणे ही लक्षणे जाणवतात.

Canva

मुलांना वाढ आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी जास्त प्रथिनांची आवश्यकता असते.

Canva

दिवसाच्‍या सुरुवातीलाच डाळीपासून केलेल्‍या पदार्थांसह पनीर किंवा दही यांचा यांचा नाश्त्यामध्ये समावेश करा. हे पदार्थ सुमारे १०–२० ग्रॅम प्रथिने देतात.

Canva

डाळ-भात एकत्र खाल्ल्याने शरीरातील अमिनो ॲसिड संतुलित राहतात आणि जेवणाची प्रथिनांची गुणवत्ता वाढते.

Canva

दूध, पनीर आणि दही फक्त कॅल्शियमचे स्रोत नाहीत; तर ते ५–१० ग्रॅम प्राेटीन देतात.

Canva

एका अंड्यामध्ये ६ ग्रॅम प्रथिने असते.  प्राेटीनसाठी अंडे हे सर्व वयोगटासाठी झटपट आणि बहुउपयोगी पर्याय ठरताे.

Canva

शरीरातील प्रत्येक पेशी, संप्रेरक (हार्मोन्स) आणि विकर (एंझाईम) प्रथिनांवर अवलंबून असतात. त्‍यामुळे प्रोटीनयुक्‍त आहाराकडे दुर्लक्ष करु नका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Canva
येथे क्‍लिक करा..