Alcohol and Cancer risk: कधीतरी दारू प्यायल्याने कॅन्सर होतो का? दिवसाला किती प्रमाण सुरक्षित; काय सांगतात तज्ञ?

'मर्यादित प्रमाणात मद्यपान केल्यास शरीरावर परिणाम होत नाही' असा एक गोड समज अनेकांचा आहे. मात्र, हाच समज आता कर्करोगाला आमंत्रण देणारा ठरत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
Alcohol
Alcohol File Photo
Published on
Updated on

Alcohol and Cancer risk

नवी दिल्ली: मित्रांसोबत अधूनमधून मद्यपान करणे आजकाल प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. शिवाय 'मर्यादित प्रमाणात मद्यपान केल्यास शरीरावर परिणाम होत नाही' असा एक गोड समज अनेकांचा आहे. मात्र, हाच समज आता कर्करोगाला आमंत्रण देणारा ठरत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.

नवी दिल्लीतील राजीव गांधी कर्करोग संस्था आणि संशोधन केंद्राचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. विनीत तलवार यांनी 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या एका मुलाखतीत कठोर वास्तव मांडले आहे. "कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी मद्यपानाची कोणतीही मर्यादा सुरक्षित नाही," असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

Alcohol
Unmarried Cancer risk: अविवाहितांना कॅन्सरचा धोका ८५ टक्क्यांनी अधिक; जगभरातील 'सिंगल्स'ची झोप उडवणारा अहवाल प्रसिद्ध

मद्यपान आणि कर्करोगाचा थेट संबंध आहे का?

जागतिक आरोग्य संघटना आणि जगभरातील कर्करोगतज्ज्ञांच्या मते, मद्यपान हा कर्करोगासाठी कारणीभूत ठरणारा एक मोठा, तरीही दुर्लक्षित घटक आहे. डॉ. तलवार यांच्या मते, मद्यपानामुळे प्रामुख्याने मुख आणि घशाचा कर्करोग, अन्ननलिका आणि यकृताचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि आतड्याच्या कर्करोगाचा धोका वाढतो. जरी तुम्ही खूप कमी प्रमाणात आणि कधीतरीच मद्यपान करत असाल, तरीही दीर्घकाळानंतर त्याचे गंभीर परिणाम शरीरावर दिसून येतात.

शरीरात नक्की काय घडतं?

मद्यपान केल्यानंतर शरीरात होणाऱ्या प्रक्रियेबद्दल डॉ. तलवार यांनी सांगितले की, "जेव्हा अल्कोहोल शरीरात जाते, तेव्हा त्याचे रूपांतर 'ॲसिटाल्डिहाइड' या विषारी घटकात होते. हा घटक थेट आपल्या पेशींमधील 'डीएनए' खराब करतो आणि पेशींच्या दुरुस्ती प्रक्रियेत अडथळा आणतो. यामुळेच कर्करोगाची सुरुवात होते." याशिवाय, मद्यपानामुळे शरीरातील इस्ट्रोजेन या संप्रेरकाची पातळी वाढते, ज्यामुळे महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. तसेच, मद्यपानामुळे शरीराला 'फोलेट' सारखी आवश्यक पोषक तत्वे शोषून घेण्यास अडथळा निर्माण होतो, जे सुदृढ पेशींसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात.

किती दारू पिणं सुरक्षित?

अनेकांना वाटते की आपण रोज पीत नाही म्हणजे आपल्याला धोका नाही. मात्र, डॉक्टरांनी ते चुकीचं असल्याचे सांगितले आहे. मद्यपानाचे प्रमाण जितके जास्त, तितका धोका मोठा हे खरे असले तरी, अगदी कमी मद्यपान करणाऱ्यांना धोका नसतो हे चुकीच आहे. कर्करोग प्रतिबंधासाठी मद्यपानाचे प्रमाण जास्तीत जास्त कमी करणे किंवा ते पूर्णपणे टाळणे हाच एकमेव सुरक्षित मार्ग आहे," असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

Alcohol
Breast cancer | गाठ नसली तरीही...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news