HEALTH ALERT : सावधान! झोपतानाचा मंद प्रकाशही हृदयासाठी ठरतो अपायकारक! नवीन संशोधनात काय आढळले?

बेडरूममधील मोबाईलची स्क्रीन, एलईडी दिव्याचा थेट होतो हृदयाच्या आरोग्यावर परिणाम
Nighttime Light Exposure
प्रतिकात्‍मक छायाचित्र. AI-generated image
Published on
Updated on

Nighttime Light Exposure : झोपताना मोबाईल स्क्रीनच्या अगदी मंद प्रकाशाचाही हृदयाच्या रचनेवर आणि कार्यावर हानिकारक परिणाम होतो. बेडरूममध्ये गरजेपेक्षा जास्त प्रकाश असेल तर त्याचा थेट हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे एका नवीन संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

हृदयाच्या आरोग्यावर परिणाम

'युरोपियन हार्ट जर्नल'मध्ये प्रकाशित झालेल्या नवीन अभ्यासानुसार, रात्रीच्या झोपेत असणारे प्रकाश प्रदूषण अगदी चांदण्यांचा प्रकाश किंवा दाराच्या फटीतून येणारा प्रकाश मानवी हृदयाला नुकसान पोहोचवतो. या संशोधनाचे नेतृत्व करणारे अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स येथील तुलाने युनिव्हर्सिटीचे लू ची यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "रात्रीच्या वेळी जास्त प्रकाशाच्या संपर्कात येण्याचा थेट संबंध 'कार्डियाक रिमॉडेलिंग'शी (हृदयाच्या रचनेतील बदल) आहे. यामध्ये हृदयाची रचना आणि कार्यप्रणाली बदलते, जी सहसा दीर्घकालीन ताण किंवा हृदयाला झालेल्या दुखापतीमुळे दिसून येते."

Nighttime Light Exposure
HEALTH WARNING : चहा-कॉफी खूप कडक पिण्याची सवय आहे? सावधान, कॅन्सरचा धोका तिप्पट! नवीन संशोधन काय सांगते?

झोपताना बेडरूममध्ये संपूर्ण अंधार असणे गरजेचे

शरीर या ताणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असले तरी, "शेवटी यामुळे हृदय कमकुवत होते आणि हार्ट फेलिअरचा (हृदयक्रिया बंद पडण्याचा) धोका निर्माण होऊ शकतो," असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, बेडरूम शक्य तितकी अंधारमय ठेवणे ही "वैद्यक आणि धोरणकर्त्यांनी हृदयविकार टाळण्यासाठीच्या संभाव्य उपायांपैकी एक महत्त्वपूर्ण उपाय म्हणून विचारात घेतली पाहिजे," असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

तीन वर्षांच्या संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष

या अभ्यासात ११,०७१ लोकांचा समावेश करण्यात आला होता. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांना एका आठवड्यासाठी रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या प्रकाशात ठेवण्यात आले होते. यात पूर्ण अंधारापासून ते दाराच्या फटीतून येणाऱ्या किंवा मोबाईलच्या मंद प्रकाशाइतक्या वेगवेगळ्या तीव्रतेच्या प्रकाशाचा समावेश होता. तीन वर्षांनंतर, सहभागींच्या हृदयाच्या रचनेत आणि कार्यात काही संभाव्य बदल झाले आहेत का, हे तपासण्यासाठी त्यांची 'कार्डिओव्हस्कुलर मॅग्नेटिक रेझोनन्स' स्कॅन चाचणी करण्यात आली.

Nighttime Light Exposure
Men's Health News : पुरुषांसाठी महत्त्वाची बातमी! इरेक्टाइल डिसफंक्शन हे हृदयविकार आणि डायबिटीजचे संकेत - रिसर्च

हृदयाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम

संशोधनाच्या निकालांवरून असे दिसून आले की, रात्री जास्त प्रकाशाच्या संपर्कात येणाऱ्यांच्या हृदयाच्या डाव्या बाजूच्या कप्प्याच्या भिंती जाड झाल्या होत्या. यामुळे व्हेन्ट्रिकलमधील (हृदयाच्या कप्प्यातील) पोकळी कमी झाली. तसेच, हृदयाच्या स्पंदनादरम्यान होणाऱ्या लवचिकतेची क्षमता कमी झाल्याचे संकेत मिळाले. हे हृदयाच्या कार्यात अडथळा निर्माण होण्याचे प्राथमिक लक्षण आहे.

कोणते उपाय ठरतात लाभदायक?

"बेडरूममध्ये किती अंधार असतो, तसेच रुग्ण रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतो का आणि सूर्यास्तानंतर किती स्क्रीनचा वापर केला जातो?" हेही प्रश्‍न महत्त्‍वाचे आहेत. यासोबतच, 'ब्लॅकआउट' पडदे वापरणे, रात्रीच्या वेळी उबदार रंगांचे दिवे वापरणे आणि घरातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे छोटे स्टँडबाय एलईडी झाकून ठेवण्याचा सल्ला संशोधक देतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news