Mobile Addiction Symptoms | सावधान! मोबाईलचं ‘व्यसन’ तुमचं आयुष्य पोखरत तर नाही ना? ओळखा ही ७ धोक्याची लक्षणं!

Mobile Addiction Symptoms | काही विशिष्ट लक्षणे तुम्हाला लागलेले मोबाईलचे व्यसन स्‍पष्‍ट करते
Mobile Addiction Symptoms | सावधान! मोबाईलचं ‘व्यसन’ तुमचं आयुष्य पोखरत तर नाही ना? ओळखा ही ७ धोक्याची लक्षणं!
Published on
Updated on
Summary

सतत मोबाईल वापरामुळे तुमचं आयुष्य पोखरत नाही ना? फोन व्यसनाची ७ धोकादायक लक्षणं, आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि ओळखण्याचे संकेत जाणून घ्या.

Mobile Addiction Symptoms

मुंबई :आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, अनेकांकडून फोनचा अतिवापर होत असून, काही विशिष्ट लक्षणांच्या आधारे तुम्हाला मोबाईलचे व्यसन (Mobile Addiction) जडले आहे का, हे ओळखता येऊ शकते.

मोबाईल फोनचा वापर अनिवार्य...

सध्याच्या काळात स्मार्टफोनशिवाय पान हलत नाही. कॉल्स, मेसेज, सोशल मीडिया, ऑनलाइन पेमेंट, शॉपिंग आणि मनोरंजनासाठी मोबाईलचा वापर अपरिहार्य झाला आहे. गरज म्हणून सुरू झालेला हा वापर कधी सवयीत आणि पर्यायाने व्यसनात रूपांतरित होतो, हे सहसा लक्षात येत नाही.अनेक जण दिवसभर, रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्या उठल्या मोबाईलला चिकटलेले असतात. जर तुम्हीही सतत फोन सोबत बाळगत असाल, तर खालील ७ लक्षणांवरून तुम्ही मोबाईलच्या आहारी गेल्याचे स्पष्ट होते. जाणून घेवूया ही लक्षणे...

Mobile Addiction Symptoms | सावधान! मोबाईलचं ‘व्यसन’ तुमचं आयुष्य पोखरत तर नाही ना? ओळखा ही ७ धोक्याची लक्षणं!
Mental Health | मनशांती हवीय? नक्की ट्राय करा 'या' ६ सोप्या टिप्स

दर काही मिनिटांनी फोन चेक करणे

अनेक लोकांना कोणत्याही कारणाशिवाय वारंवार फोन पाहण्याची सवय असते. नोटिफिकेशन आलेले नसतानाही लोक वारंवार फोन अनलॉक करतात. ही कृती मोबाईल व्यसनाचे प्राथमिक लक्षण आहे.

Mobile Addiction Symptoms | सावधान! मोबाईलचं ‘व्यसन’ तुमचं आयुष्य पोखरत तर नाही ना? ओळखा ही ७ धोक्याची लक्षणं!
Mobile Phone Addiction: पालकांनो, सावधान! तुमच्या मुलाच्या हातातला मोबाईल त्याचं जग हिरावून घेत नाहीये ना?

फोनपासून दूर राहिल्यास अस्वस्थता

तुम्ही फोन घरी विसरलात किंवा बॅटरी संपली, तर तुम्हाला घाबरल्यासारखे होणे, चिडचिड होणे किंवा प्रचंड अस्वस्थता जाणवत असेल, तर तुम्ही फोनवर प्रमाणाबाहेर अवलंबून आहात हे स्पष्ट होते.

Mobile Addiction Symptoms | सावधान! मोबाईलचं ‘व्यसन’ तुमचं आयुष्य पोखरत तर नाही ना? ओळखा ही ७ धोक्याची लक्षणं!
Mobile addiction in children | तुमच्या मुलांच्या हातात सतत मोबाईल असतोय का?, असे ठेवा त्यांना दूर....

प्रत्यक्ष संवादाचा अभाव

लोकांशी समोरासमोर बोलण्याऐवजी तुम्हाला सोशल मीडिया किंवा चॅटिंगवर बोलणे अधिक सोयीचे वाटत असेल, तर हे मोबाईलच्या वाढत्या प्रभावाचे लक्षण आहे.

Mobile Addiction Symptoms | सावधान! मोबाईलचं ‘व्यसन’ तुमचं आयुष्य पोखरत तर नाही ना? ओळखा ही ७ धोक्याची लक्षणं!
Mobile Phone Addiction : मोबाईलवर वाचन करताय? जाणून घ्या नवीन संशोधन काय सांगते?

कामात लक्ष न लागणे

वारंवार फोन चेक करण्याच्या सवयीमुळे एकाग्रता भंग पावते. जर तुमच्या अभ्यासावर, ऑफिसच्या कामावर किंवा घरातील कामावर मोबाईलमुळे परिणाम होत असेल, तर तुम्ही व्यसनाच्या मार्गावर आहात.

नात्यांमध्ये दुरावा निर्माण होणे

तुमचे कुटुंबीय किंवा मित्र तुम्हाला वारंवार फोन बाजूला ठेवण्याचा सल्ला देत असतील किंवा मोबाईलमुळे तुमच्या नात्यात तणाव निर्माण होत असेल, तर ही एक धोक्याची घंटा आहे.

Mobile Addiction Symptoms | सावधान! मोबाईलचं ‘व्यसन’ तुमचं आयुष्य पोखरत तर नाही ना? ओळखा ही ७ धोक्याची लक्षणं!
Mobile Addiction : अभ्यासाऐवजी मोबाइल गेमचे वेड नडले : हातात मोबाइल आहे, असे समजून दहा कि.मी. पायपीट

चुकीच्या वेळी फोनचा वापर

अनेकांना वेळेचे भान न ठेवता फोन वापरण्याची सवय लागते. डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये, मीटिंगमध्ये, मुलांच्या शिक्षकांशी बोलताना किंवा ट्रॅफिक सिग्नलवर असतानाही जर तुम्ही फोन वापरत असाल, तर हे गंभीर लक्षण आहे.

झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर

रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने झोप न येणे, डोळ्यांची जळजळ, अंधुक दिसणे, मान आणि मनगट दुखणे, डोकेदुखी आणि थकवा यांसारख्या समस्या उद्भवतात. या शारीरिक तक्रारी मोबाईल ॲडिक्शनचाच परिणाम आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news