Diabetes and Litchi | डायबेटिसमध्ये लीची खाणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या फायदे-तोटे
Diabetes and Litchi
बाजारात सहज मिळणारा आणि चवदार असलेले फळ म्हणजे लीची. रसाळ आणि गोडसर चवीमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ती आवडते. मात्र, मधुमेह म्हणजेच डायबेटिस असलेल्या रुग्णांनी ही लीची खावी की टाळावी, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. चला जाणून घेऊया की लीची मधुमेह रुग्णांसाठी कितपत योग्य आहे, तिचे फायदे आणि तोटे काय आहेत.
लीचीमधील पोषक घटक काय आहेत?
लीचीमध्ये व्हिटॅमिन C, पोटॅशियम, कॉपर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. हे घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, त्वचेला आरोग्यदायी ठेवतात आणि शरीर हायड्रेटेड ठेवतात. मात्र त्यात नैसर्गिक साखरही भरपूर प्रमाणात असते, जी डायबेटिस रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते.
डायबेटिस असताना लीची खाणं योग्य की अयोग्य?
डायबेटिस असलेल्या व्यक्तींनी जर लिमिटमध्ये म्हणजेच दिवसाला २ ते ३ लीची खाल्ली, तर ती विशेष हानी करत नाही. मात्र त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कारण लीचीचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढू शकते.
लीचीचे फायदे
लीचीतील फायबरमुळे रक्तातील साखर लगेच वाढत नाही.
अँटीऑक्सिडंट्समुळे सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो, जो डायबेटिस रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
शरीर थंड आणि फ्रेश राहतो.
लीचीचे तोटे
ज्यांचे ब्लड शुगर आधीच जास्त आहे, त्यांनी लीची टाळावी.
खाली पोट लीची खाल्ल्यास शुगर अचानक वाढू शकते.
जास्त प्रमाणात खाल्ल्यास हायपरग्लायसेमिया होण्याचा धोका.
लीची खाण्याचा योग्य मार्ग:
दिवसातून ३ पेक्षा जास्त लीची खाऊ नका.
लीची लो-ग्लायसेमिक फूड्स (जसं की बदाम, मूग डाळी) सोबत खा.
रात्रि किंवा उपाशीपोटी लीची खाणं टाळा.
लीची खाल्ल्यानंतर ब्लड शुगर लेव्हल मॉनिटर करा.

