पार्किन्सन रोग : मेंदूचा न्यूरोडिजेनेरेटिव्ह आजार

मेंदूतील डोपामिन या रसायनाच्या कमतरतेमुळे होतो
parkinsons-disease-a-neurodegenerative-brain-disorder
पार्किन्सन रोग : मेंदूचा न्यूरोडिजेनेरेटिव्ह आजारPudhari File Photo
Published on
Updated on
डॉ. महेश बरामदे

पार्किन्सन हा एक न्यूरोडिजेनेरेटिव्ह म्हणजेच मज्जासंस्थेचा हळूहळू बिघडणारा आजार असून, प्रामुख्याने मेंदूतील डोपामिन या रसायनाच्या कमतरतेमुळे होतो.

पार्किन्सन या आजारात रुग्णाला हालचाल, संतुलन व समन्वय राखण्यात अडचणी येतात. पार्किन्सन हा आजार बहुदा वयोमानानुसार वाढत जातो आणि पुरुषांमध्ये त्याची शक्यता स्त्रियांपेक्षा थोडी जास्त असते, असे काही अभ्यासांमधून दिसून आले आहे.

या रोगात मेंदूतील सबस्टॅन्शिया नायग्रा नावाच्या भागातील डोपामिन निर्मिती करणार्‍या पेशी नष्ट होतात. डोपामिन हे एक न्यूरोट्रान्समीटर असून, मेंदूतील सिग्नल्सची देवाणघेवाण योग्य पद्धतीने व्हावी यासाठी आवश्यक असते. डोपामिनची पातळी 60 ते 80 टक्क्यांच्या खाली गेली की, पार्किन्सनची लक्षणे प्रकट होऊ लागतात.

प्रमुख लक्षणे :

हालचालींचा वेग मंदावणे.

मांसपेशींतील कडकपणा (रिजिडिटी).

संतुलनाचा अभाव व पडण्याची शक्यता वाढणे.

चेहर्‍यावर भाव न दिसणे, आवाज मंद होणे यांसह निद्रानाश, बद्धकोष्ठता, लघवीवर नियंत्रण कमी होणे, रक्तदाब अचानक घसरणे, स्मरणशक्ती कमी होणे, औदासिन्यता इत्यादी लक्षणे या आजारात दिसतात.

पार्किन्सनचे निदान होण्यासाठी विशिष्ट प्रयोगशाळा चाचणी नाही. याचे निदान मुख्यतः रुग्णाच्या लक्षणांवर व वैद्यकीय तपासणीतून केले जाते. काही प्रकरणांमध्ये एम.आर.आय., डोपामिन ट्रान्सपोर्टर स्कॅन यांचा उपयोग होतो.

पार्किन्सनसाठी संपूर्ण इलाज सध्या उपलब्ध नाही, पण औषधोपचारांद्वारे लक्षणांवर नियंत्रण ठेवता येते.

- फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, चाल सुधारण्यासाठी व्यायाम, आहार व्यवस्थापन, मनोवैज्ञानिक सल्ला यांचा या व्याधीत मोठा फायदा होतो.

हा आजार हळूहळू वाढत जातो. सुरुवातीस लक्षणे सौम्य असतात, पण कालांतराने रुग्णाला स्वतःच्या दैनंदिन कामकाजासाठी मदतीची आवश्यकता भासू शकते. पार्किन्सन पूर्णपणे टाळता येत नाही, पण संशोधन दर्शवते की नियमित व्यायाम, आरोग्यदायी आहार आणि विषारी द्रव्यांपासून दूर राहणे या गोष्टी आजाराचा धोका कमी करू शकतात. याबाबत संशोधन अजूनही सुरू असून भविष्यात या रोगावर अधिक प्रभावी उपचार मिळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news