NPS Swasthya Pension Scheme: NPS स्कीम घेणाऱ्यांची चांदी... आता पेन्शनसोबतच 'कॅशलेस' आरोग्य विमा देखील मिळणार

जुन्या NPS खातेदारांनी आरोग्य विमा मिळवण्यासाठी काय करावं; जाणून घ्या कव्हर किती मिळणार
NPS Swasthya Pension Scheme
NPS Swasthya Pension Schemepudhari
Published on
Updated on

NPS Swasthya Pension Scheme: नॅशनल पेन्शन स्कीम ही खासगी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी म्हातारपणाची सोय म्हणून एक उत्तम स्कीम आहे. त्यामुळं अनेक लोकं नॅशनल पेन्शन स्कीमला पहिली पसंती देतात. मात्र ही योजना आता फक्त निवृत्तीनंतर पेन्शन देण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. लवकरच NPS गुंतवणूकदारांना एक मोठी भेट मिळणार आहे. आता तुमचे म्हातारपण आर्थिक नाही तर आरोग्याच्या दृष्टीकोणातून देखील सुरक्षित होणार आहे.

NPS Swasthya Pension Scheme
NPS Vatsalya Scheme | ‘एनपीएस वात्सल्य’मध्ये दरमहा १000 रुपये गुंतवल्यास...

NPS शी आता आरोग्य विमा देखील जोडला जाणार

मिळालेल्या माहितीनुसार पेन्शन फंड नियामक मंडळ, एनपीएसला अजून आकर्षक करण्यासाटी त्यात मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. एनपीएस स्कीम घेतलेल्या लोकांना निवृत्तीनंतर पेन्शनसोबतच आता आरोग्य विमा कव्हर देखील देण्याचा विचार सुरू आहे.

निवृत्तीनंतर वरिष्ठांचा सर्वाधिक खर्च हा त्यांच्या आरोग्यावर आणि औषध उपचारांवर होतो. जर एनपीएससोबतच आरोग्य विमा देखील लिंक केला गेला तर निवृत्तीनंतर एनपीएस गुंतवणूकदारकांसाठी उपचाराच्या खर्चासाठी आपल्या पेन्शमधील रक्कम खर्च करावी लागणार नाही.

NPS Swasthya Pension Scheme
High Court On Teacher Salary NPS Issue: NPS खाते न उघडल्याने शिक्षकांचे वेतन रोखले; मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

योजनेचे दोन भाग

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूक आणि आरोग्य विमा यासाठी वेगवेगळे खाते असणार आहे. आरोग्य विमा सुपर टॉप अप स्वरूपात असणार आहे. या योजनेअंतर्गत कॅशलेस उपचाराची सोय असणार आहे. विमा कव्हर हे ३० लाखापर्यंतचे असणार आहे. वास्तवात विमा कव्हर हे तुम्ही निवडलेला प्लॅन आणि त्याच्या अटींवर अवलंबून असणार आहे. ज्या लोकांचे आधीपासूनच एनपीएस खाते आहे. ते आपले जुने खाते बंद न करता एनपीएस हेल्थ खाते उघडू शकतात.

NPS Swasthya Pension Scheme
Children health insurance | मुलांसाठी आरोग्यविमा कोणता घ्यावा? इंडेम्निटी की बेनिफिट?

जुन्या खातेधारकांना काय करावं लागणार?

जर तुम्ही आधीपासूनच एनपीएस गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला नवीन एनपीएस हेल्थ खाते उघडावे लागणार आहे. नवीन खाते उघडल्यावर जुने खाते बंद करण्याची गरज नाही. तुमच्या जुन्या खात्यातून नव्या हेल्थ खात्यात काही रक्कम सहज ट्रान्सफर करता येणार आहे. ट्रान्सफर करण्यात आलेली रक्कम तुम्ही निवडलेल्या हेल्थ कव्हरच्या प्लॅनची सुरूवातीच्या खर्चासाठी वापरली जाईल. तुमच्या पॉलिसीनुसार ही रक्कम १० हजार, ५० हजार, १ लाख किंवा ३ लाखापर्यंत असू शकते.

NPS Swasthya Pension Scheme
Health Insurance: गेल्या 6 वर्षांत हेल्थ इन्शुरन्सच्या तक्रारी दुप्पट वाढल्या; पॉलिसीचा फायदा होतोय की त्रास?

गंभीर आजारासाठी २५ टक्के रक्कम काढता येणार

एनपीएस गुंतवणूक करणाऱ्यांसाठी वैद्यकीय इमर्जन्सीसाठी काही चांगले नियम आहेत. त्यात खातेधारकाला ओपीडी आणि रूग्णलयात दाखल झाल्यानंतर खर्चासाठी आपल्या एनपीएस आरोग्य खात्यातून २५ टक्के रक्कम काढता येणार आहे. जर रूग्णालयाचा खर्च एनपीएस आरोग्य खात्यातील २५ टक्के रक्कमेपेक्षा जास्त असेल तर खात्यातील पूर्ण रक्कम रूग्णालयाचे बील भागवण्यासाठी वापरता येणार आहे.

NPS Swasthya Pension Scheme
Old Pension Scheme | जुनी पेन्शन योजनेसाठी 12 डिसेंबरला दिल्लीत हुंकार! रामलीला मैदानावर धडकणार लाखो कर्मचारी

कॅशलेसची देखील सोय

या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे उपचारावेळी संपूर्ण बिलिंग प्रक्रिया कॅशलेस असणार आहे. रूग्णालयातून गरजेची माहिती मिळाल्यानंतर पहिल्या १ तासात कॅशलेस उपचाराला परवानगी देण्याची तरतूद आहे. तसेच रूग्णालयातून सुट्टी मिळाल्यावर जवळपास ३ तासात देखील रक्कम देण्याची सुविधा असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news