Heart disease signs: हृदयविकाराची ७ सुरुवातीची लक्षणे हातांवर दिसतात

हृदयाच्या आरोग्याबाबत काही महत्त्वाचे इशारे आपल्या हातांवरही दिसू शकतात. ही लक्षणे दिसल्यास घाबरण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Heart disease signs on hands
Heart disease signs on handsfile photo
Published on
Updated on

Heart disease signs on hands

हृदयविकार म्हटलं की छातीत दुखणे, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल किंवा धूम्रपान यांसारखी लक्षणे डोळ्यासमोर येतात. मात्र, हृदयाच्या आरोग्याबाबत काही महत्त्वाचे इशारे आपल्या हातांवरही दिसू शकतात. प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ डॉ. एरिक बर्ग यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार, हातांमध्ये दिसणारे काही बदल हृदयविकार किंवा रक्ताभिसरणाशी संबंधित समस्यांचे संकेत असू शकतात. अर्थात, ही लक्षणे दिसल्यास घाबरण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

१. हाताची पकड कमकुवत होणे

डॉ. बर्ग यांच्या मते, हाताची पकड कमी होणे हे हृदयाच्या कमकुवत आरोग्याचे संकेत असू शकते. स्नायूंची कमजोरी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळेही अशी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा बदल दुर्लक्षित करू नये.

२. अनामिका सहज उचलता न येणे

हात टेबलावर सपाट ठेवून फक्त अनामिका उचलण्याचा प्रयत्न करा. जर ती सहज उचलता आली नाही किंवा तळहाताची त्वचा जास्त ताणलेली वाटत असेल, तर मधुमेह किंवा शरीरातील दाह यांसारख्या समस्या असण्याची शक्यता असू शकते. या दोन्ही गोष्टी हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.

Heart disease signs on hands
Weight Loss: GLP-1 औषधांनी वजन घटवताय? सावधान, प्रत्येक वजन कमी होणे आरोग्यासाठी फायदेशीर नाही; हृदयरोगतज्ज्ञांचा इशारा

३. नखांचा आकार बदलणे

बोटांच्या टोकांचा आकार फुगल्यासारखा दिसणे आणि नखे खाली वाकल्यासारखी वाढणे हे हृदयाशी संबंधित समस्यांचे संकेत असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

४. नखांचा रंग पांढरा होणे

सामान्यतः निरोगी व्यक्तींच्या नखांच्या आतील भागाचा रंग गुलाबी असतो. मात्र, हा रंग पांढरा किंवा दुधळ दिसू लागल्यास तो शरीरातील काही गंभीर आरोग्य समस्यांचा इशारा असू शकतो.

५. हाताच्या स्नायूंवर पिवळसर गाठी दिसणे

हातांवर पिवळसर गाठी दिसणे हे रक्तातील चरबीची पातळी वाढल्याचे लक्षण असू शकते आणि हे आरोग्याच्या इतर समस्यांचे संकेत मानले जातात.

६. हातांना सूक्ष्म कंप येणे

हातांना सूक्ष्म कंप सुटणे याचा थेट संबंध हृदयाशी नसेलही, परंतु कधीकधी हे अतिसक्रिय थायरॉईड किंवा इतर आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते, ज्यांचा परिणाम हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर होतो.

७. सतत हात थंड पडणे

हवामान थंड नसतानाही हात कायम थंड राहत असतील, विशेषतः तणावाच्या वेळी ही समस्या वाढत असेल, तर रक्ताभिसरणातील अडथळा किंवा इतर हृदयविकाराशी संबंधित कारणे असू शकतात. त्यामुळे वैद्यकीय तपासणी करून घेणे योग्य ठरेल.

Heart disease signs on hands
Psychology: प्रत्येक गोष्टीसाठी 'Thank You' म्हणणे शिष्टाचार की मानसिक दोष? मानसशास्त्र काय सांगते?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news