Sugarcane Juice: उन्हाळ्यात ऊसाचा रस पिताय? डॉक्टरांनी दिला इशारा; कोणते आजार होऊ शकतात?

Sugarcane Juice Side Effects: उन्हाळ्यात गारगार ऊसाचा रस शरीराला ऊर्जा आणि हायड्रेशन देतो, पण त्याचे काही धोकेही आहेत.
Sugarcane Juice Side Effects
Sugarcane Juice Side EffectsPudhari
Published on
Updated on

Sugarcane Juice Side Effects: उन्हाळ्याच्या कडक उष्णतेत ऊसाचा रस अनेकांसाठी दिलासा देणारा असतो. रस्त्याच्या कडेला मिळणारा हा गोड आणि थंड रस शरीराला ताजेतवाने करतो, ऊर्जा देतो आणि डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठीही अनेक जण तो आवडीने पितात. मात्र दिसायला हेल्दी वाटणारा हा रस आरोग्यासाठी धोकेही निर्माण करू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

नारायणा हेल्थ मधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. मुकेश नंदल यांच्या मते, ऊसाचा रस शरीराला पटकन ऊर्जा आणि हायड्रेशन देतो, पण त्याचं अतिसेवन किंवा अस्वच्छ ठिकाणचा रस आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

नैसर्गिक साखरही ठरू शकते धोकादायक

ऊसाच्या रसात नैसर्गिक साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. ऊसाचा रस तयार करताना त्यातील फायबर कमी होतं. त्यामुळे साखर थेट रक्तात वेगाने मिसळते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. विशेषतः मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे धोकादायक ठरू शकतं. तज्ज्ञांच्या मते, जास्त प्रमाणात ऊसाचा रस प्यायल्यास लठ्ठपणा आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढू शकतो.

कोणत्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी?

मधुमेह, लठ्ठपणा किंवा फॅटी लिव्हरची समस्या असलेल्या लोकांनी ऊसाचा रस मर्यादित प्रमाणात घ्यावा. अशा लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मोठ्या प्रमाणात रस पिणं टाळावं.

अस्वच्छतेमुळे होऊ शकतात गंभीर आजार

ऊसाच्या रसाशी संबंधित आणखी एक मोठा धोका म्हणजे स्वच्छता. जर रस काढण्याची मशीन नीट साफ नसेल, ग्लास स्वच्छ नसतील किंवा वापरलेलं पाणी आणि बर्फ दूषित असेल तर गंभीर संसर्ग होऊ शकतो. यामुळे टायफॉइड, कॉलरा आणि हिपॅटायटिससारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.

Sugarcane Juice Side Effects
Stock Market Crash: शेअर बाजारात मोठा भूकंप; काही मिनिटांत गुंतवणूकदारांचे 7.5 लाख कोटी रुपये बुडाले, नेमकं काय घडलं?

काय काळजी घ्यावी?

तज्ज्ञांच्या मते, नेहमी स्वच्छ आणि विश्वासार्ह ठिकाणाहूनच ऊसाचा रस घ्यावा. रस काढण्याची मशीन, ग्लास आणि बर्फाची गुणवत्ता तपासणं महत्त्वाचं आहे. तसेच अतिप्रमाणात रस पिणं टाळावं.

ऊसाचा रस वाईट आहे का?

तज्ज्ञ सांगतात की, योग्य प्रमाणात आणि स्वच्छ ऊसाचा रस शरीराला ऊर्जा आणि हायड्रेशन देण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. मात्र कोणतीही गोष्ट मर्यादेतच चांगली असते. त्यामुळे योग्य काळजी घेऊनच ऊसाच्या रसाचं सेवन करणं गरजेचं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news