

साखर (ब्लड शुगर) नियंत्रणात ठेवणे हे मधुमेह (डायबिटीज) असलेल्या व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. यामध्ये केवळ अन्न नाही, तर आपण घेत असलेली पेये (drinks) देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. काही पेये असे असतात की त्यामध्ये भरपूर प्रमाणात साखर, कार्बोहायड्रेट्स किंवा कृत्रिम पदार्थ असतात, जे डायबिटिक आणि प्री-डायबिटिक रुग्णांसाठी घातक ठरू शकतात. खाली अशाच पेयांची माहिती दिली आहे, जी शक्यतो टाळावीत
साधारणतः सॉफ्ट ड्रिंक्समध्ये भरपूर साखर असते. एका मध्यम साइजच्या बॉटलमध्ये ३०-४० ग्रॅमपर्यंत साखर असते. ही साखर त्वरीत रक्तात मिसळते आणि ब्लड शुगर वाढवते. त्यामुळे डायबिटीज असलेल्यांनी सॉफ्ट ड्रिंक्सपासून पूर्णपणे दूर राहावे.
बाजारात मिळणारे पॅकबंद फळांचे रस हे 'हेल्दी' वाटले तरीही त्यात साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. शिवाय फायबर कमी असल्यामुळे ते शरीरात लवकर शोषले जातात आणि रक्तातील साखर अचानक वाढते. घरगुती स्वरूपात केलेला 'न साखरयुक्त' रसही मर्यादित प्रमाणातच घ्यावा.
एनर्जी ड्रिंक्समध्ये साखर, कॅफीन आणि कृत्रिम फ्लेवर्स असतात. काही ड्रिंक्समध्ये एकावेळी ५० ग्रॅमहून अधिक साखरही असू शकते. हे ड्रिंक्स शरीरात इन्सुलिनची कार्यक्षमता कमी करू शकतात, जे डायबिटीजसाठी अतिशय धोकादायक ठरते.
मोठ्या कॅफे चेनमधून मिळणाऱ्या फ्लेवर्ड कॉफी किंवा कॅपुचिनोमध्ये साखर, क्रीम, सिरप आणि टॉपिंग्स असतात. यामुळे एकाच कपमधून ३००-४०० कॅलरी आणि प्रचंड साखर शरीरात जाते. त्यामुळे डायबिटिक रुग्णांनी साधी ब्लॅक कॉफी किंवा लो-फॅट दूधासह कॉफी पिणेच योग्य.
यामध्ये दूधासोबत साखर, ड्रायफ्रूट्स, सिरप आणि बर्फी/आइसक्रीम सारखे घटक मिसळले जातात. त्यामुळे हे पेये चविष्ट असले तरी साखरेचे प्रमाण फारच अधिक असते. विशेषतः जेव्हा आपण बाहेरून विकत घेतो, तेव्हा त्यात साखर अजून जास्त असते.
बिअर, वाईन, रम, व्हिस्की इत्यादी पेयांमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि साखर असते. यामुळे रक्तातील ग्लुकोज लेव्हल अस्थिर होते. शिवाय अल्कोहोल लिव्हरवर परिणाम करून इन्सुलिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते. डॉक्टरांचा सल्ला न घेता अल्कोहोलचे सेवन टाळावे.
डायबिटिक आणि प्री-डायबिटिक रुग्णांनी केवळ अन्नावरच नाही, तर पेयांवरही लक्ष देणे गरजेचे आहे. पाणी, नारळपाणी, लिंबूपाणी (साखरविरहित), ग्रीन टी, ब्लॅक टी अशा नैसर्गिक पेयांचा समावेश आपल्या आहारात करावा. कोणतेही पेय घेताना त्यात साखर, कार्बोहायड्रेट्स किंवा कृत्रिम घटकांचे प्रमाण किती आहे याकडे विशेष लक्ष द्या.