FOFO: डॉक्टरकडे जाण्याची भीती? FOMO ऐकलंय… पण FOFO माहितीये का? अर्ध्याहून अधिक लोकांचा जीव धोक्यात

FOFO Fear of Finding Out: FOFO म्हणजे ‘रिपोर्ट वाईट येईल’ या भीतीमुळे लोक आरोग्य तपासण्या टाळतात. ताज्या सर्व्हेनुसार, अनेक जण भीती, लाज किंवा चिंता यामुळे स्क्रिनिंग चाचण्या करतचं नाहीत.
FOFO Fear of Finding Out
FOFO Fear of Finding OutPudhari
Published on
Updated on

FOFO Fear of Finding Out: आरोग्य तपासण्या, स्क्रिनिंग टेस्ट, ब्लड टेस्ट, मॅमोग्राफी, त्वचेची तपासणी… या सर्व गोष्टी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पण तरीही अनेक लोक या चाचण्या टाळतात. यामागे कारण असू शकतं FOFO- Fear of Finding Out, म्हणजेच काहीतरी वाईट निदान होईल या भीतीने चाचणीच करायची नाही.

FOMO (Fear of Missing Out) हे सगळ्यांना माहित आहे, पण FOFO हा तुलनेने नवा शब्द आहे. डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ आणि आरोग्य तज्ञ सांगतात की ही समस्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढत आहे.

FOFO म्हणजे नेमकं काय?

तज्ञ सांगतात की FOFO बहुतेकवेळा भीती, चिंता किंवा पूर्वीचे वाईट अनुभव यांमधून येते. अमेरिकन मानसशास्त्रीय संघटनेतील मनोवैज्ञानिक लिन बुफ्का सांगतात की, “लोक काही वाईट गोष्टी कळतील म्हणून तपासणीच करत नाहीत, यालाच FOFO म्हणतात”

तज्ञांच्या मते FOFO विशेषत: खालील लोकांमध्ये आढळतो:

  • जास्त चिंता करत असलेले लोक

  • OCD किंवा हेल्थ अ‍ॅन्झायटी असलेले लोक

  • डॉक्टरांच्या भेटीची भीती (iatrophobia) असलेले लोक

  • आधी चाचणीचा वाईट अनुभव आलेले लोक

काही लोक STD, कॅन्सर किंवा इतर गंभीर आजार कळेल या भीतीने टेस्ट करत नाहीत.

FOFO का वाढतोय?

2025 च्या सर्व्हेमध्ये 60% लोक आरोग्य तपासण्या टाळतात. फक्त 51% लोकांनी मागील वर्षी नियमित चेकअप करून घेतले आहे. हे मागील वर्षाच्या तुलनेत 10% कमी आहे. परिणामी, अनेकांना उशिरा आजाराचे निदान होत आहे, जे अधिक धोकादायक ठरू शकते.

लोक तपासणी का टाळतात?

  • वाईट बातमी ऐकण्याची भीती

  • लाज वाटेल

  • डॉक्टर किंवा हॉस्पिटलची भीती

  • दीर्घकाळ रिपोर्टची वाट पाहण्याची चिंता

  • उपचार घ्यावे लागतील याचा ताण

  • कुटुंब किंवा समाज काय म्हणेल याची चिंता

FOFO Fear of Finding Out
Viral Video: चिमुकलीच्या निष्पाप कृतीने थांबली चोरी! व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

FOFOवर मात कशी करायची?

स्वतःला प्रश्न विचारा — फायदे जास्त की तोटे?

तपासणी करून घेतल्याचे फायदे:

  • आजार लवकर कळतो

  • उत्तम उपचार मिळतात

  • जीव वाचण्याची शक्यता वाढते

टाळण्याचे तोटे:

  • परिस्थिती गंभीर झाल्यावरच कळते

  • उपचार कठीण व महाग होतात

  • मानसिक ताण वाढतो

तज्ञ सांगतात की “Short-term भीतीमुळे आपण टेस्ट टाळतो, पण long-termमध्ये धोका वाढतो.”

FOFO Fear of Finding Out
Hit the Ball Twice: क्रिकेटमधील दुर्मिळ घटना! बॉल दोनदा बॅटला लागला आणि भारतीय फलंदाज OUT; कारण ऐकून थक्क व्हाल

तुम्हाला टेस्टची भीती वाटत असेल तर डॉक्टरांशी बोला:

  • डॉक्टरांना भीती वाटत आहे असं सांगा

  • त्यांनी दिलेल्या प्लॅननुसार टेस्ट करून घ्या

  • रिपोर्टची वाट पाहताना काय करायचं ते आधी ठरवा

जर FOFO मोठ्या चिंतेमुळे होत असेल, तर कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (CBT) उपयुक्त ठरू शकते. अनेक टेस्ट असतील तर एकाच दिवशी करा यामुळे मानसिक ताण कमी होतो. तसेच सपोर्ट सिस्टीम तयार ठेवा. कोणाला तरी सोबत घेऊन जा. टेस्ट झाल्यावर स्वतःला छोटीशी ट्रीट द्या यामुळे भीती कमी होण्यास मदत मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news