एन्डोमेट्रिओसिस ही स्त्रियांमध्ये होणारी एक सामान्य पण क्लिष्ट अशी समस्या आहे. यामध्ये गर्भाशयाच्या आतल्या अस्तरासारखी ऊती गर्भाशयाच्या बाहेर वाढू लागतात. या ऊती अंडाशय, फॅलोपियन ट्यूब्स किंवा पेल्विक कॅविटीमध्ये सुद्धा सापडू शकतात. ही स्थिती महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करते आणि संशोधनानुसार यामुळे गर्भपाताचा धोका वाढू शकतो.
एन्डोमेट्रिओसिसमुळे एक पेल्विक भागात सूज आणि जळजळ निर्माण होते, जी अंडाशयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते. तसेच फॅलोपिन ट्यूब्समध्ये अडथळा निर्माण होऊन अंडाणू आणि शुक्राणू यांचा संयोग होणे कठीण होते. गर्भधारणा झाली, तरी एन्डोमेट्रिओसिसमुळे गर्भाशयाच्या अस्तरात योग्य बदल न झाल्यामुळे भ्रूणाची योग्यरीत्या वाढ होऊ शकत नाही.
जळजळ आणि सूज : एन्डोमेट्रिओसिसमुळे शरीरात क्रॉनिक इंफ्लॅमेशन होतो, जो गर्भाच्या वाढीस अडथळा ठरू शकतो.
हार्मोनल असंतुलन : ही स्थिती हार्मोनल गोंधळ निर्माण करते, जो गर्भ टिकवण्यास आवश्यक असलेल्या प्रोजेस्टेरॉन हार्मोनवर परिणाम करतो.
इम्यून सिस्टिमची प्रतिक्रिया : काही स्त्रियांमध्ये शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली भ्रूणाला परकीय शरीर मानून त्यावर आक्रमण करू शकते.
अस्वस्थ गर्भाशयाचे वातावरण : भ्रूणासाठी योग्य गर्भाशयाचे अस्तर तयार न झाल्यास गर्भ टिकून राहण्याची शक्यता कमी होते.
नियमित वैद्यकीय तपासणी स्त्री रोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे, योग्य वेळी उपचार जसे की, हार्मोनल थेरपी, शस्त्रक्रिया (जर आवश्यक असेल तर)
एन्डोमेट्रिओसिस असलेल्या महिलांनी गर्भधारणा करताना अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे. ही स्थिती उपचाराने नियंत्रणात ठेवता येते. त्यामुळे वेळेवर निदान आणि योग्य उपचार हाच गर्भपाताचा धोका कमी करण्याचा मुख्य उपाय आहे.