

DINK ही जीवनशैली भारतात हळूहळू स्वीकारली जात असली, तरीही ती अजूनही सामाजिकदृष्ट्या चर्चेचा विषय आहे. प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार निर्णय घेणं गरजेचं आहे. कोणत्याही जीवनशैलीस फायदे आणि तोटे असतात. त्यामुळे हा निर्णय काळजीपूर्वक आणि दोघांच्या संमतीने घ्यावा. 'DINK' (Double Income, No Kids) म्हणजेच 'दुहेरी उत्पन्न, पण मूल नाही' या जीवनशैलीत जोडपी मुलं होण्याचा निर्णय टाळतात किंवा पुढे ढकलतात. स्वत: चे करिअर, आर्थिक स्वातंत्र्य, आणि वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करतात. जाणून घेवूया 'डिंक' जीवनशैली विषयी...
"Double Income, No Kids" म्हणजे दोघंही नोकरी करणारे पण मूल न होण्याचा निर्णय घेणारे दाम्पत्य.
ही संकल्पना पाश्चात्य देशांमध्ये 1980-90 च्या दशकात उदयाला आली, आता भारतातही लोकप्रिय होत आहे.
अनेक तरुण दाम्पत्य आर्थिक स्वातंत्र्य, करिअर, वैयक्तिक आयुष्यातील समाधान यासाठी मुलं होण्याचे टाळतात.
आर्थिक कारणं : मुलं न असल्यामुळे जास्त पैसे बचत करता येतात, आवडती वस्तू खरेदी करता येतात, प्रवास, मनोरंजन आणि भविष्यासाठी गुंतवणूक करता येते.
करिअरवर लक्ष केंद्रित: मुलं नसल्यामुळे व्यावसायिक यश मिळवायला वेळ आणि ऊर्जा मिळते.
वैयक्तिक अनुभव: काही महिलांनी पालकांकडून मिळालेल्या वाईट अनुभवांमुळे मूल होण्याचं टाळलं.
योग्य जोडीदार नसणे: 50+ वयोगटातील काही लोक म्हणतात की योग्य जोडीदार न मिळाल्यामुळे मूल नकोसं झालं.
आर्थिक अस्थिरता: काही लोक म्हणतात की, मुलांना वाढवण्यासाठी त्यांच्याकडे योग्य आर्थिक स्थिती नाही.
भारतात अजूनही विवाहानंतर मुलं होणं ही 'अवश्य असणारी गोष्ट' म्हणून पाहिली जाते.
त्यामुळे DINK जीवनशैली समाजासाठी अजूनही धक्कादायक आहे.
सामाजिक दबाव, नातेवाईकांचे प्रश्न, टोमणे यांना सामोरे जावे लागते.
काही दाम्पत्यांमध्ये मूल हवं-नको यावरून वाद निर्माण होतात.
कधी कधी यामुळे घटस्फोटही होतात.
वृद्धापकाळात एकटेपणा, काळजी घेणारा कोणी नसेल याची चिंता होते.
काही लोक मूल झालं तरी पुढे ते परदेशात जातात आणि पालक एकटे राहतात.
पाश्चात्य देशांत एक मूल वाढवण्यासाठी 1.7 ते 2.6 कोटी रुपये खर्च होतो.
भारतात ही रक्कम इतकी नसली तरी शिक्षण व आरोग्य खर्च सतत वाढतोय.
तरीही, हे निर्णय वैयक्तिक आहेत आणि योग्य-चुकीचं ठरवणं कठीण आहे.