

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे स्वतःसाठी वेळ काढणे कठीण झाले आहे. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी जेवण कमी करतात किंवा व्यायाम सुरू करतात, पण तरीही वेट लॉस होत नाही. यामुळे निराशा वाढते आणि मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. अशावेळी आहारातून काही हेल्दी आणि कमी कॅलरीचे स्नॅक्स निवडल्यास वजन कमी करण्यास मदत होते. योग्य खाण्याची निवड केल्यास फेट बर्न करणं सोपं होतं आणि मेटाबॉलिजमही बूस्ट होतो.
१. दही आणि बेरी
दहीमध्ये प्रोटीन मुबलक असते, तर बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स. हे दोन्ही कमी कॅलरी असलेले असून, एकत्रित सेवन केल्यास वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. याला सकाळच्या स्नॅक्समध्ये समाविष्ट करू शकता.
२. ड्राय फ्रूट्स
काजू, बदाम, पिस्ता हे ड्राय फ्रूट्स आरोग्यासाठी लाभदायक असून, त्यात हेल्दी फॅट आणि फाइबर असतो. उन्हाळ्यात हे भिजवून खाल्यास उत्तम. हे पचनक्रिया सुधारतात आणि भूक कमी लागते.
३. चिया सीड्स
चिया सीड्समध्ये फाइबर, ओमेगा-३ आणि प्लांट बेस्ड प्रोटीन असते. दूध किंवा पाण्यात भिजवून खाल्यास हे एक उत्तम हेल्दी स्नॅक ठरते.
४. ताजे फळ
तरबूज, खरबूज, पपई यांसारखी फळे उन्हाळ्यात उपयुक्त ठरतात. ही शरीराला ऊर्जा देतात, इम्युनिटी वाढवतात आणि वजन कमी करण्यात मदत करतात.
५. ओट्स
फाइबर आणि प्रोटीनने भरपूर असलेले ओट्स वेट लॉससाठी आदर्श आहेत. यामध्ये फळं, कोको पावडर, चॉकलेट चिप्स किंवा भाज्या घालून खाल्यास ते चविष्ट आणि पोषणमूल्याने भरलेले बनते.