

रूक्ष, निस्तेज आणि गळणारे केस यामुळे त्रस्त असाल आणि कोणता घरगुती उपाय शोधत असाल, तर त्याचे उत्तर तुमच्या स्वयंपाकघरातच आहे. लिंबूमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म केसांच्या समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतात. लिंबाचा वापर विविध प्रकारे केला जाऊ शकतो. जसे लिंबू पाण्याचा स्प्रे, एलोवेरासोबत हेअर मास्क, दह्याच्या मिश्रणासोबत किंवा नारळ तेलात मिसळून. या सर्व उपायांनी केस गळती, डँड्रफ आणि स्कॅल्प इन्फेक्शन यावर नियंत्रण मिळवता येते.
लिंबू पाणी:
२-४ लिंबूचे रस काढून त्यात पाणी मिसळून शँपू केल्यानंतर केसांवर लावा. यामुळे डँड्रफ कमी होतो आणि स्कॅल्प स्वच्छ राहतो.
लिंबू + एलोवेरा जेल:
लिंबूमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात आणि एलोवेरा केसांना मॉइश्चर देतो. हे मिश्रण अर्धा तास लावून ठेवा, आठवड्यातून २ वेळा वापरल्यास केस मऊ आणि चमकदार होतात.
लिंबू + दही:
लिंबू स्कॅल्प इन्फेक्शन कमी करतो, तर दही केसांसाठी कंडिशनरप्रमाणे काम करते. हेअर फॉल थांबवण्यास आणि केस मजबूत करण्यास मदत होते.
लिंबू + नारळ तेल:
नारळ तेल स्कॅल्प हायड्रेट करतं, तर लिंबू डँड्रफ कमी करतो. हे मिश्रण केसांना पोषण देते आणि संक्रमणापासून संरक्षण करते.
लिंबाचा रस केसांवर लावल्यावर लगेच सूर्यप्रकाशात जाऊ नका, यामुळे केस कोरडे आणि रंग उडाल्यासारखे होऊ शकतात.
संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी लिंबाचा रस थेट न लावता इतर घटकांबरोबर मिसळून वापरावा.
आठवड्यातून २ पेक्षा जास्त वेळा लिंबू वापरू नये, कारण जास्त प्रमाणात वापरल्यास केस कोरडे होऊ शकतात.
1. स्कॅल्प डिटॉक्स करते:
लिंबू स्कॅल्पवर साचलेले मृत पेशी, केमिकल्स, धूळ आणि प्रदूषण दूर करून टाळू डिटॉक्स करते.
2. केसांची वाढ वाढवते:
लिंबूतील व्हिटॅमिन C कोलाजेन निर्मितीस चालना देतो, जे केसांची वाढ (Hair Growth) वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे.
3. ऑइल कंट्रोल करतो:
लिंबूमध्ये असलेले ॲसिडिक गुणधर्म टाळूवरील अतिरिक्त तेल नियंत्रित करतात आणि केस हलके व ताजे ठेवतात.
4. जळजळ कमी करतो:
लिंबूचा रस स्कॅल्पवरील खाज, जळजळ किंवा रॅशेससुद्धा कमी करू शकतो, याचे थंडावणारे आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म मुळे.