

Dangerous Weight Loss Trend GLP1 Injections Health Risk: आजच्या सोशल मीडियाच्या युगात ‘स्लिम दिसणं’ ही फॅशन नाही, तर एक प्रकारची स्पर्धा झाली आहे. पण या स्पर्धेत अनेकजण आरोग्याचा विचारच करत नाहीत. वजन कमी करण्याच्या अतिरेकी वेडेपणामुळे आता एक नवीन धोका समोर येतोय. याबाबत डॉक्टरांनी स्पष्ट इशारा दिला आहे.
इन्स्टाग्रामवर दिसणारी परफेक्ट बॉडी, सेलिब्रिटींचा फिटनेस आणि झटपट ‘स्लिम’ करणाऱ्या औषधांमुळे लोक वेगाने वजन कमी करण्याकडे वळत आहेत. विशेषतः GLP-1 वेट लॉस इंजेक्शन (जसे ओझेम्पिक, वेगोवी, मौनजारो) यांची मागणी भारतात झपाट्याने वाढत आहे. ही औषधं मूळतः डायबिटीजसाठी तयार झाली होती. पण आता ती ‘कॉस्मेटिक वेट लॉस’साठी मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहेत.
2024 मध्ये या औषधांचा बाजार सुमारे 1000 कोटी रुपयांचा होता आणि 2030 पर्यंत तो 4-5 पट वाढण्याचा अंदाज आहे. 2025 मध्येच विक्री 571 कोटींवरून 1230 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
मुंबईतील डायटीशियन सुचिता श्रीवास्तव यांच्या मते, “गाल कमी करणं किंवा चेहरा आत जाणं म्हणजे हेल्दी वेट लॉस नाही.” जेव्हा वजन खूप वेगाने कमी होतं, तेव्हा फक्त फॅटच नाही तर मसल्स आणि त्वचेखालील फॅटही कमी होतं. त्यामुळे चेहरा थकलेला दिसतो. जर डाएटमध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन्स कमी असतील, तर त्वचेची गुणवत्ता कमी होते आणि चेहरा वयस्कर दिसू लागतो.
अनेक लोक वजन कमी करण्यासाठी औषधांसोबत खूप कमी जेवन करतात. पण यामुळे शरीर ‘स्टार्वेशन मोड’मध्ये जातं म्हणजेच शरीर स्वतःचे मसल्स तोडून ऊर्जा निर्माण करू लागतं. यामुळे मसल लॉस, अशक्तपणा आणि शरीर सैल होतं. पाण्याचं कमी सेवन, इलेक्ट्रोलाइट्सकडे दुर्लक्ष आणि पोषणतत्वांची कमतरता यामुळे स्किन ड्राय होते, केस गळतात आणि थकवा वाढतो.
वेगाने वजन कमी केल्यास अनेक आवश्यक पोषक घटक कमी होतात:
प्रोटीन कमी - मसल लॉस
आयर्न कमी - थकवा, पिवळसर त्वचा
व्हिटॅमिन B12 कमी - चक्कर, अशक्तपणा
व्हिटॅमिन D आणि कॅल्शियम कमी - हाडं कमकुवत
ओमेगा-3 कमी - स्किन ड्राय
यामुळे शरीर आतून कमजोर होतं आणि चेहरा निस्तेज दिसतो.
बॅरिएट्रिक सर्जरी तज्ज्ञ डॉ. शरद शर्मा यांच्या मते, “GLP-1 औषधं घेतल्यावर वजन कमी होतं, पण त्यात 20% ते 40% हिस्सा मसल्सचा असू शकतो.” याचा अर्थ वजन कमी होत असलं तरी शरीर कमकुवत होतंय. तसेच, या औषधांमुळे भूक कमी होते, कॅलरी कमी घेतल्या जातात आणि शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी मसल्स तोडतं. म्हणूनच, योग्य प्रोटीन आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग अत्यंत गरजेचं आहे.
तज्ज्ञांच्या मते, या औषधांचा दीर्घकालीन वापर केल्यास गंभीर साइड इफेक्ट्स होऊ शकतात:
पॅन्क्रियाजमध्ये सूज
गॉल ब्लॅडर समस्या
किडनीवर परिणाम
हायपोग्लायसीमिया
पचनसंस्थेच्या तक्रारी
सेलेब्रिटी फिटनेस कोच प्रसाद शिर्के यांच्या मते, “हा ट्रेंड खूप धोकादायक आहे. लोक फक्त दिसण्यासाठी शरीराचं नुकसान करत आहेत.”
तज्ज्ञांच्या मते, सुरक्षित आणि हेल्दी वजन कमी करण्यासाठी दर आठवड्याला 0.5 ते 1 किलो वजन कमी करा. यापेक्षा जास्त वेगाने वजन कमी करणं शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. तसेच 3-6 महिन्यांत 5-10% वजन कमी करणं योग्य आहे. यामुळे डायबिटीज, ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात येऊ शकतं
आहार नियंत्रण (Dietary Changes):
कॅलरीज कमी करा: तुम्ही जितक्या कॅलरीज खाता, त्यापेक्षा कमी खा.
प्रथिने वाढवा: आहारात अंडी, डाळी, पनीर, सोयाबीनचा समावेश करा, यामुळे पोट भरलेले राहते.
फायबर: भाज्या, फळे, सॅलड, ज्वारी, बाजरी खा.
साखर आणि मैदा टाळा: गोड पदार्थ, सोडा, बिस्किटे आणि मैदा कमी करा.
रात्रीचे जेवण हलके: रात्री 8 वाजेपूर्वी जेवण करा आणि जेवणात भरपूर भाज्या असाव्यात.
व्यायाम (Physical Activity):
दररोज व्यायाम: दररोज किमान 30 मिनिटे वेगाने चालणे, धावणे किंवा योगासने करा.
स्ट्रेंथ ट्रेनिंग: आठवड्यातून दोनदा स्नायू बळकट करण्यासाठी व्यायाम (Weight Training) करा, ज्यामुळे मेटाबॉलिज्म (चयापचय) वाढतो.
जीवनशैलीत बदल:
पाणी भरपूर प्या: जेवणापूर्वी १-२ ग्लास पाणी प्या, यामुळे भूक कमी लागते.
पुरेशी झोप: रोज ७-८ तासांची चांगली झोप घ्या.
हळूहळू वजन कमी करा: आठवड्याला ०.५ ते १ किलो वजन कमी करणे हे निरोगी मानले जाते.
वजन कमी करणं महत्त्वाचं आहे पण ते हळूहळू, संतुलित आहार आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच केलं पाहिजे. अनेकजण वजन कमी करण्याच्या नादात स्वतःच्या आरोग्याशी खेळत आहेत.