Pregnancy And Chicken | प्रेग्नंसीमध्ये चिकन खाणे योग्य की आयोग्य ? जाणून घ्या सविस्तर

Pregnancy And Chicken | गरोदरपणात योग्य आहार घेणे हे आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते.
Pregnancy And Chicken
Pregnancy And Chicken Canva Image
Published on
Updated on

गरोदरपणात योग्य आहार घेणे हे आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर्स यांचा समावेश असलेला संतुलित आहार गर्भाच्या वाढीस मदत करतो आणि आईला आरोग्यदायी ठेवतो. अनेकदा गरोदर महिलांना चिकन खाणे योग्य आहे की नाही असा प्रश्न पडतो. चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती.

Pregnancy And Chicken
वसई-विरार महापालिकेचा नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डीच्या घरी सापडले कोट्यवधीचे घबाड

प्रेग्नंसीमध्ये चिकन खाणे सुरक्षित आहे का?

होय, चिकन हे गरोदर महिलांसाठी सुरक्षित आणि पौष्टिक अन्न आहे, पण ते योग्य पद्धतीने शिजवणे आणि स्वच्छता पाळणे अत्यावश्यक आहे. चिकनमध्ये लीन प्रोटीन भरपूर प्रमाणात असते जे बाळाच्या शारीरिक आणि मेंदूच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. विशेषतः दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये जेव्हा भ्रूणाची वाढ झपाट्याने होते.

चिकनमध्ये बी ग्रुप व्हिटॅमिन्स विशेषतः B6 आणि नियासिन असतात जे ऊर्जा निर्मिती आणि चयापचय प्रक्रियेस चालना देतात. तसेच झिंक आणि आयर्नचीही चांगली मात्रा चिकनमध्ये आढळते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आणि शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी उपयोगी असते.

याशिवाय, चिकनमध्ये कमी चरबी असते, त्यामुळे ज्या महिला गरोदरपणात वजन नियंत्रणात ठेवू इच्छितात त्यांच्यासाठीही हे एक उत्तम पर्याय ठरतो. तसेच, चिकनमध्ये विटॅमिन A, विटॅमिन E आणि सेलेनियमसारखे घटक असतात जे आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य सुधारतात.

चिकन बनवताना कोणती काळजी घ्यावी?

  • चिकनमध्ये साल्मोनेला यांसारख्या हानिकारक जीवाणू असू शकतात. त्यामुळे चिकन नीटपणे पूर्ण शिजवणे गरजेचे आहे.

  • अर्धवट किंवा कच्चं चिकन खाल्ल्याने अन्नातून होणारे आजार होऊ शकतात, जे गर्भवती महिलांसाठी धोकादायक ठरू शकतात.

  • चिकन स्वच्छतेने तयार केलेले, प्रक्रिया नसलेले (non-processed) आणि योग्य प्रमाणात खाल्ले गेले तर ते पूर्णतः सुरक्षित आहे.

  • सॉसेजसारख्या प्रोसेस्ड चिकन उत्पादनांमध्ये जास्त मीठ असतो, त्यामुळे अशा गोष्टी मर्यादित प्रमाणात खाणे शिफारसीचे आहे.

  • शक्य असल्यास ऑरगॅनिक किंवा फ्री-रेंज चिकन वापरावे.

Pregnancy And Chicken
Health Checkup | डायबेटीस आहे? मग HbA1c तपासणी नक्की करा!

गट हेल्थ आणि चिकन

चिकन हे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहे, मात्र गट हेल्थ (पचनसंस्था) सुधारण्यासाठी ते पुरेसे नाही. म्हणून चिकनसोबत फायबरयुक्त भाज्या जसे की पालक, गाजर, बीन्स यांचा समावेश करावा. त्यासोबत दही, ताक यासारखे फर्मेंटेड पदार्थ घेतल्यास पचनक्रिया सुधारते आणि पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढतात.

गरोदरपणात गट हेल्थ चांगले ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते कारण त्याचा परिणाम पोषणशोषण आणि रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. गरोदरपणात चिकन खाणे सुरक्षित आणि उपयुक्त आहे, पण शिजवण्याची पद्धत योग्य असावी, स्वच्छता राखली जावी आणि ते अति प्रमाणात न खाल्लेलेच चांगले. संतुलित आहारात चिकनचा समावेश केल्यास आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यास लाभ होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news