Breath Problem Solutions | थोडं चाललं की दम लागतो? शरीर देतेय 'या' गंभीर आजारांचे संकेत

Breath Problem Solutions | सतत थकवा, श्वास घ्यायला त्रास होतोय? ही ५ लपलेली कारणं तुमच्या आरोग्यासाठी असू शकतात धोकादायक
Breath Problem Solutions
Breath Problem SolutionsCanva
Published on
Updated on

Breath Problem Solutions

थोडं चाललं की श्वास लागतोय? हा फक्त वयानुसार होणारा बदल नसून शरीरात काही गंभीर बिघाडाचे संकेत असू शकतात. योग्य वेळेत कारणं ओळखा आणि 5 सोप्या उपायांनी श्वासाचा त्रास दूर करा.

Breath Problem Solutions
Lemon Water Benefits | लिंबूपाण्याचे फायदे अनेक, पण ‘अति’ वापर ठरतो घातक!

श्वास हीच जीवनाची खरी डोरी असते. मात्र हलकंसं चढणं, चालणं किंवा रोजच्या कामात थोडंही exertion झालं की श्वास घ्यायला त्रास होतो ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. वजन वाढ, वयोमान अशा कारणांबरोबरच श्वसनक्रियेशी संबंधित आजार, पोषणतत्त्वांची कमतरता, आणि हार्मोनल असंतुलन देखील यामागे असू शकतात.

न्यूट्रिशनिस्ट रमिता कौर यांनी यामागील ५ प्रमुख कारणं आणि त्यावरचे ५ घरगुती उपाय सांगितले आहेत. हे उपाय नियमित केल्यास श्वास लागणे आणि थकवा या समस्या दूर होऊ शकतात.

श्वास घ्यायला त्रास होण्यामागची 5 कारणं:

  1. शरीरात हीमोग्लोबिन व आयर्नची कमतरता

  2. फुफ्फुसांची क्षमता कमी होणे (shallower breathing)

  3. व्हिटॅमिन B12 व D यांची कमतरता

  4. शरीरात टॉक्सिन्स साचणे व स्टॅमिना कमी होणे

  5. हार्मोनल असंतुलन व मेटाबॉलिझम मंदावणे

Breath Problem Solutions
Copper Water | तांब्याच्या बाटलीतील पाणी आरोग्यासाठी किती सुरक्षित? जाणून घ्या सत्य

आरोग्य टिकवण्यासाठी 5 महत्त्वाचे उपाय:

1. डाएट सुधारणा:

  • दिवसाची सुरुवात बीट आणि आवळा रसाने करा

  • रोज कडीपत्ता आणि भिजवलेल्या काळ्या मनुका खा हे थकवा आणि आयर्नसाठी लाभदायक ठरते

2. श्वसनासाठी योगप्राणायाम:

  • दररोज अनुलोम-विलोम आणि भ्रामरी प्राणायाम फक्त ५ मिनिटं करा

  • स्टेअर इंटरवल वॉकिंग – १ मजला हळूहळू चढा, विश्रांती घ्या, हे दिवसातून २-३ वेळा करा

3. ऊर्जा वाढवणारे अन्नघटक:

  • जेवणात गहू, नाचणी (मिलेट्स) आणि तूपाचा समावेश

  • जेवण चुकवू नका – यामुळे एनर्जी लवकर संपते

महत्वाचा इशारा:

या उपायांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. ही माहिती सोशल मीडियावर आधारित असून प्रत्येकासाठी परिणाम वेगळा असू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news