Lemon Water Benefits | लिंबूपाण्याचे फायदे अनेक, पण ‘अति’ वापर ठरतो घातक!

Lemon Water Benefits | लिंबूपाण्याचे पिताना ‘ही’ ५ चुका टाळा, अन्यथा होऊ शकतो अपाय
Lemon Water Benefits
Lemon Water BenefitsCanva
Published on
Updated on

Lemon Water Benefits

वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यावर अनेक लोक लिंबूपाणी पितात. मात्र, हे पाणी किती आणि कसे प्यायचे, याची योग्य माहिती नसेल तर याचे दुष्परिणाम तुमच्या पचनतंत्रावर आणि दातांवर होऊ शकतात.

Lemon Water Benefits
weight loss exercises | दररोज सकाळी फक्त 'हे' ५ व्यायाम करा, पोटावरील चरबी होईल गायब

लिंबूपाणी म्हणजे फक्त वजन कमी करण्याचे साधन नाही, तर हे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकणे, त्वचेला उजळपणा देणे आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही मदत करतं. पण याच लिंबूपाण्याचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास त्याचे विपरीत परिणाम दिसू लागतात.

लिंबूपाण्याचे फायदे आणि धोके एकत्र ओळखा:

फायदे:

  • विटॅमिन C चा चांगला स्रोत

  • पचन सुधारते

  • वजन कमी करण्यास मदत

  • त्वचेला चमक देतो

  • इम्युनिटी वाढवतो

धोके:

  • रोज जास्त प्रमाणात प्यायल्यास एसिडिटी, अपचन, मळमळ, उलट्या होऊ शकतात

  • दातांचे इनॅमल कमजोर होते, सेंसिटिव्हिटी वाढते

  • काही वेळेस अन्ननलिकेत जळजळ होते.

Lemon Water Benefits
Copper Water | तांब्याच्या बाटलीतील पाणी आरोग्यासाठी किती सुरक्षित? जाणून घ्या सत्य

कसे घ्यावे लिंबूपाणी?

  • कोमट पाण्याचा वापरून बनवल्यास ते अधिक गुणकारी होते.

  • गॅस किंवा अॅसिडिटी असेल तर उपाशी पोटी टाळा, नाश्त्यानंतर घ्या.

  • एकदाच दिवसभरात पुरेसे, वारंवार प्यायल्यास शरीरात अम्लता वाढते.

  • दातांवरील आम्लाचा परिणाम टाळण्यासाठी पिण्यानंतर साध्या पाण्याने तोंड धुवा

  • हनी किंवा काळं मीठ घातल्यास स्वाद आणि गुणधर्म वाढतात.

वजन कमी करायचंय? तर फक्त लिंबूपाणी पुरेसं नाही

वजन कमी करणे हे केवळ एका पेयाने शक्य नसते. त्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य झोप हवीच. लिंबूपाणी हा फक्त एक पूरक उपाय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news