Blood Group And Cancer Risk | या रक्तगटाच्या लोकांना असतो कॅन्सरचा धोका अधिक, तुमचा रक्तगट कोणता?

Blood Group And Cancer Risk | आजकालचा बदललेला जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे कर्करोगासारख्या आजारांची झपाट्याने वाढ होत आहे
Blood Group And Cancer Risk
Blood Group And Cancer Risk Canva
Published on
Updated on

Blood Group And Cancer Risk

आजकालचा बदललेला जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे कर्करोगासारख्या आजारांची झपाट्याने वाढ होत आहे. विशेषतः पोटाचा कर्करोग एक धोकादायक आणि वाढता प्रकार मानला जातो. अनेक वेळा लोक तपासणी करत राहतात, पण काय तुम्हाला माहिती आहे का की तुमचा ब्लड ग्रुप (रक्तगट) देखील कर्करोगाच्या धोक्याशी जोडलेला असू शकतो?

Blood Group And Cancer Risk
Increase Sperm Count | शुक्राणूंच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी

ब्लड ग्रुप म्हणजे काय?

रक्तगट हा तुमच्या आई-वडिलांकडून अनुवांशिकतेने मिळतो. बहुतेक लोकांचे रक्तगट A, B, AB किंवा O असे असतात. हे रक्तगट तुमच्या रक्तातील पेशींवर असलेल्या प्रोटीन आणि साखरेच्या संरचनेवर आधारित असतात. काहींचा RH Positive किंवा Negative गट असतो. यामुळे शरीरात कोणत्या प्रकारचे अँटीबॉडीज तयार होतील, हे ठरते.

पोटाच्या कर्करोगाचा आणि ब्लड ग्रुपचा काय संबंध आहे?

2019 मध्ये BMC Cancer मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, ब्लड ग्रुप A आणि AB असलेल्या लोकांमध्ये पोटाच्या कर्करोगाचा धोका अधिक असतो.

अभ्यासातील निष्कर्ष:

  • ब्लड ग्रुप A असलेल्या लोकांना 13% जास्त धोका

  • ब्लड ग्रुप AB असलेल्या लोकांना 18% जास्त धोका

  • इतर 40 स्टडीजमध्येही हेच ट्रेंड दिसून आला

Blood Group And Cancer Risk
Sitting-Rising Test | सिटिंग-रायझिंग टेस्ट : तंदुरुस्त शरीराचं एकक

या लोकांना अधिक धोका का?

शरीरात सूज नियंत्रण, इम्यून सिस्टमचे काम आणि सेल्समधील संवाद या प्रक्रियांमध्ये ब्लड ग्रुपचा परिणाम होतो. ब्लड ग्रुप A असलेल्या लोकांमध्ये पचनासाठी लागणाऱ्या अॅसिडचे प्रमाण तुलनेत कमी असते, त्यामुळे पचन नीट होत नाही.

तसेच, Helicobacter pylori नावाच्या जंतूची लागण ब्लड ग्रुप A असलेल्या लोकांना लवकर होते. हाच जंतू पोटाच्या कर्करोगाशी जोडलेला आहे. AB गट असलेल्या लोकांमध्ये हा धोका H. pylori संक्रमण झाल्यास अधिक वाढतो.

पोटाचा कर्करोग कुठे जास्त आढळतो?

  • अमेरिका, युरोप, आशिया आणि दक्षिण अमेरिकेतील काही भागांत

  • पुरुषांमध्ये धोका महिलांपेक्षा दुप्पट

  • वय वाढल्यास धोका वाढतो

  • युवा हिस्पॅनिक महिलांमध्येही प्रमाण झपाट्याने वाढत आहे

  • फॅमिली हिस्टरी, अन्नपद्धती, आणि लठ्ठपणा हे ही कारणीभूत घटक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news