Avocado benefits: रोज एक ॲव्होकॅडो खाल्ल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? फायदे आणि खाण्याची योग्य वेळ कोणती?

ॲव्होकॅडो फळातील पोषक घटक शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. रोज एक ॲव्होकॅडो खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. रोज ॲव्होकॅडो खाल्ल्याने काय होते ते जाणून घ्या.
Avocado
Avocado File Photo
Published on
Updated on

Avocado benefits:

ॲव्होकॅडो हे दिसायला अतिशय आकर्षक फळ आहे. लोक आता या फळाबद्दल अधिक जागरूक होत आहेत आणि आपल्या आहारात त्याचा समावेश करू लागले आहेत. जरी काहींना त्याची चव कदाचित आवडत नसेल, तरी त्यातील पोषक घटक शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. तज्ञांच्या मते, ॲव्होकॅडोला सुपरफ्रूट म्हणणे अगदी योग्य आहे; कारण रोज एक ॲव्होकॅडो खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. रोज एक ॲव्होकॅडो खाल्ल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घेऊया.

ॲव्होकॅडोमध्ये कोणती पोषक तत्वे असतात?

सुपरफ्रूट असलेल्या ॲव्होकॅडोमध्ये जीवनसत्त्वे सी, ई, के आणि बी६ यांसारखी आवश्यक जीवनसत्त्वे, तसेच रायबोफ्लेविन, नियासिन, फोलेट, पॅन्टोथेनिक ॲसिड, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखी पोषक तत्वे असतात. याव्यतिरिक्त, यात ल्युटीन, बीटा-कॅरोटीन आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स देखील असतात. ॲव्होकॅडो हे 'हेल्दी फॅट्स' भरपूर असलेले फळ मानले जाते.

Avocado
Fruits for healthy teeth: पिवळे दात चमकवतील ‘ही’ ५ फळे

रोज एक ॲव्होकॅडो खाण्याचे फायदे काय?

तज्ञांच्या मते, कोणतेही फळ रोज खाल्ल्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. विशेषतः ॲव्होकॅडो खाल्ल्याने शरीराला विशिष्ट फायदे मिळतात.

१. हृदय निरोगी ठेवते

एवोकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणजेच आरोग्यदायी फॅट्स असतात. आहारात याचा समावेश केल्याने हृदय निरोगी राहण्यास मोठी मदत होते. तसेच, यात असणारे पोटॅशियम आणि फायबर हृदयाचे कार्य सुरळीत ठेवतात.

२. पचनसंस्थेसाठी फायदेशीर

ॲव्होकॅडो केवळ हृदयासाठीच नाही तर पचनासाठीही उत्कृष्ट मानले जाते. हे फायबरचा एक चांगला स्रोत आहे. फायबर पचनसंस्था सुधारते आणि बद्धकोष्ठता, ॲसिडिटी व गॅस यांसारख्या समस्या कमी करते. तसेच, यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहण्यास मदत होते.

३. वजन नियंत्रित करण्यास मदत करते

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही आहारात ॲव्होकॅडोचा समावेश करू शकता. फायबरव्यतिरिक्त, ॲव्होकॅडोमध्ये अशी अनेक पोषक तत्वे असतात जी पोट भरलेले ठेवण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. याचे योग्य प्रमाणात सेवन करणे उत्तम असते.

४. डोळ्यांच्या आरोग्यासाठी वरदान

ॲव्होकॅडो खाणे डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. रोज एक ॲव्होकॅडो खाल्ल्याने दृष्टी चांगली राहण्यास मदत होते आणि डोळ्यांशी संबंधित इतर समस्यांचा धोका कमी होतो. ॲव्होकॅडोमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखी कॅरोटीनॉइड्स असतात, जी डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

५. त्वचा आणि केसांसाठी फायदे

ॲव्होकॅडो तुमचे केस आणि त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर आहेत. त्यातील 'व्हिटॅमिन ई' आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचा व केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात; विशेषतः व्हिटॅमिन ई हे दोन्हीसाठी अत्यंत गुणकारी मानले जाते.

ॲव्होकॅडो कधी खावे?

तज्ज्ञांच्या मते, तुम्ही नाश्ता किंवा दुपारच्या जेवणानंतर ॲव्होकॅडो खाऊ शकता. सकाळी टोस्टसोबत, सॅलडमध्ये किंवा स्मूदीमध्ये याचा आस्वाद घेता येतो. संध्याकाळी किंवा रात्रीही ते खाऊ शकता, परंतु लक्षात ठेवा की ॲव्होकॅडोमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटू शकते. दिवसाला एक ॲव्होकॅडो खाणे साधारणपणे चांगले असते, परंतु त्यात कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्याने तुमच्या दैनंदिन आहारात याचा समतोल राखणे गरजेचे आहे.

Avocado
Dragon fruit health benefits: ड्रॅगन फ्रूट खाण्याचे ६ आश्चर्यकारक फायदे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news