पुढारी वृत्तसेवा
युरोप आणि अमेरिकेनंतर आता भारतातही 'टूथब्रश फूड्स' ही संज्ञा वेगाने लोकप्रिय होत आहे.
सुंदर हास्य आणि निरोगी जीवनशैलीसाठी नैसर्गिक टूथब्रश फूड्सचे सेवन अत्यंत गरजेचे मानले जाते.
स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरीत असणारे आम्ल दात स्वच्छ करून त्यांना नैसर्गिक उजळपणा देते. चहा किंवा कॉफीमुळे दातांवर पडलेले पिवळसर डाग स्ट्रॉबेरीमुळे हलके होण्यास मदत होते.
जेवणानंतर नियमितपणे थोडे स्ट्रॉबेरीचे सेवन करणे दातांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते.
यात मॅलिक ॲसिडचे प्रमाण भरपूर असते, जे तोंडातील लाळेचे उत्पादन वाढवते. कलिंगडातील तंतुमय धागे दातांसाठी स्क्रबचे काम करतात. यामुळे दातांवरील पिवळे आणि काळे डाग सहज निघून जातात.
पपईमध्ये अननसासारखेच 'प्रोटिओलिटिक एन्झाईम' असते. पपईतील 'पपॅन' नावाचे हे एन्झाईम दातांच्या खोलवर स्वच्छता राखण्यासाठी अत्यंत लाभदायक ठरते.
सफरचंद खाल्ल्याने तोंडात लाळेचे प्रमाण वाढते, जे नैसर्गिकरीत्या दात स्वच्छ करते.
तोंडाची दुर्गंधी निर्माण करणारे घातक बॅक्टेरिया नष्ट करण्यास आणि दात चकचकीत ठेवण्यास सफरचंद मदत करते.