Children and immunity : मुलांची रोगप्रतिकारशक्ती का हाेते कमी? जाणून घ्‍या लक्षणे आणि उपाय

Children and immunity : मुलांची रोगप्रतिकारशक्ती का हाेते कमी? जाणून घ्‍या लक्षणे आणि उपाय

हवामान बदलले की अनेक मुले आजारी पडतात. बहुतेकदा अशा मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असल्याचे दिसून येते; परंतु अनेक पालकांना याची कल्पना येत नाही. वस्तुतः, पालकांनी रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याची लक्षणे ओळखली पाहिजेत. ( Children and immunity )

वारंवार आजारी पडणे ः जर तुमचे मूल वारंवार आजारी पडत असेल, तर त्याची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, असे समजावे. विविध जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य संसर्गांचा सामना करण्यासाठी मुलाच्या शरीरात असणारे प्रतिपिंड सक्षम नाहीत, असा त्याचा अर्थ होतो. मुलांना वर्षातून 3-4 वेळा सर्दी होणे सामान्य आहे. परंतु, यापेक्षा जास्त वेळा सर्दी-खोकला-ताप येत असेल तर ते प्रतिकारशक्ती कमी असल्याचे निदर्शक मानले पाहिजे. ( Children and immunity )

सातत्याने मुलाचे पोट खराब : सातत्याने मुलाचे पोट खराब होत असेल किंवा काही समस्यांमुळे तो त्रासलेला असेल तर ते कमकुवत प्रतिकारशक्तीचे लक्षण समजावे. पोटात चांगले आणि वाईट दोन्ही बॅक्टेरिया आढळतात. पचनसंस्थेला निरोगी ठेवणार्‍या बॅक्टेरियांना चांगले बॅक्टेरिया म्हणतात. चांगले बॅक्टेरिया संसर्गाशी लढण्यासाठी उपयुक्त ठरतात. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते तेव्हा मुलाला गॅसेस, बद्धकोष्ठता आदी तक्रारी सतत होत असतात.

कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे मुलांना हाेतात 'हे' आजार

कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे मुलाला दमा, न्यूमोनिया, सायनुसायटिस आणि कानातील संक्रमण यांसारखे आजार होतात. तुमच्या मुलाला थोडा वेळ खेळून, पायर्‍या चढून किंवा थोडे धावत गेल्यावर थकवा जाणवत असेल, तर तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरते.

आहारात फळे आणि भाज्या समावेश हवा

रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असणारी मुले बहुतेक वेळ बसून घालवतात. कारण अशा मुलांमध्ये शारीरिक हालचाली खूप कमी असतात. हे लक्षात घेता पालकांनी आपल्या पाल्याला सक्रिय ठेवण्याचा आणि त्याला उत्साही बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुलाला उत्साही ठेवण्यासाठी, आपण त्यांच्या आहारात फळे आणि भाज्या समाविष्ट करा.

मुलांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या

बाळ जन्मल्यानंतर पहिले 6 महिने फक्तआईचे दूध देणे ही रोगप्रतिकारशक्ती विकसित होण्यासाठीची पहिली गरज ठरते. याखेरीज प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी मुलास लसीकरण करणे आवश्यक आहे. या लसीकरणामध्ये प्रामुख्याने डांग्या खोकला, गोवर, मेंदुज्वर, पोलिओ आणि एन्सेफलायटीस यांचा समावेश होतो. चांगल्या प्रतिकारशक्तीसाठी बालकांना चांगला व सकस आहार देणे आवश्यक आहे. प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक उत्तम प्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त ठरतात. याशिवाय मुलांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. श्वसनाचा आजार असेल, तर मुलांना घराबाहेर पडताना मास्क लावा. इन्फ्लूएंझासाठी नियमित लसीकरण आवश्यक आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news