द्वितीय वंध्यत्व : आव्हान व उपचार | पुढारी

द्वितीय वंध्यत्व : आव्हान व उपचार

डॉ. उमेश कळेकर

हल्लीच्या काळात प्राथमिक वंध्यत्व इतकीच (Primary Infertility) द्वितीय वंध्यत्वाची (Second infertility)) (म्हणजे आयुर्वेदाच्या परिभाषेत ‘सप्रजा वंध्यत्व’) समस्या प्रामुख्याने दिसते. एक अपत्य झाल्यानंतर जेव्हा दुसरा चान्स घ्यायचा निर्णय दाम्पत्य घेते तेव्हा पहिल्यांदा सहजपणे प्रेग्नन्सी राहिलेली असल्यामुळे कॅजुअली ‘राहील की लगेच’ असा अप्रोच सुरुवातीला असतो. 2-3 सायकल्स झाल्यानंतर गर्भधारणा होत नाही, असे लक्षात येते. मग थोडा रेस्टलेसनेस यायला लागतो. मग घरातल्या वडीलधार्‍यांशी, मित्र, नातेवाईकांशी काही प्रमाणात प्रोब्लेम शेअर केला जातो. कधी-कधी ‘दोन अपत्यांमध्ये असणारे अंतर (पाळणा)’ हा मुद्दा चर्चेत येतो. दाखले दिले जातात.

जसा-जसा कालावधी जातो, तशी अस्वस्थता वाढत जाते. वर्षभरानंतर मात्र धीर सुटायला लागतो व मग आपले फॅमिली डॉक्टर, गायनॅक व शेवटी वंध्यत्व तज्ज्ञ असा प्रवास सुरू होतो. मग टेस्टस्, इंवेस्टिगेशन, रिपोर्टस्, वाट बघणं… म्हणून द्वितीय वंध्यत्वाची करणे काय असू शकतात आणि त्यावर केले जाणारे उपाय, उपचार यशाचं प्रमाण या विषयांवर चर्चा करायला हवी.

द्वितीय वंध्यत्वाची कारणे :

स्त्रियांमध्ये : स्थौल्य PCOD (follicular cysts) स्त्रिबीज वाहक नलिका अवरोध (tubal blockage) गर्भाशयाच्या गाठी (Fibroids) गर्भाशयातील जाळ्या (Adhesions) गर्भाशय गादी (अस्तर)- सूज (Adenomyosis, Cystic Patches) हार्मोनल इम्बलँस काही आजार उदा. टी. बी. टॉक्सोप्लाजमोसिस.

पुरुषांमध्ये : शुक्रजंतूंची कमतरता, अचपळता लैंगिक इच्छेचा अभाव स्थौल्य यापैकी कोणते कारण आहे, त्याचा शोध घेऊन नेमकेपणाने उपचार केल्यास गर्भधारणा होऊ शकते. बाळाच्या जन्मानंतर स्त्रीच्या शरीरामध्ये स्तनपानामुळे काही हार्मोनल बदल होतात.

बीजवाहक नलिका बंद होण्याची कारणे ((Second infertility))

टी. बी. टॉक्सोप्लाज्मासारखे आजार म्युकस प्लग ट्यूबल (एक्टोपिक) प्रेग्नन्सीचा दुष्परिणाम म्हणून उत्तरबस्तीसारख्या आयुर्वेदिय उपचारांनी बंद नलिका उघडतात. गर्भाशयातील जाळ्या फायब्रोईडसारख्या अ‍ॅडिनोमायोसिस, फॉलिक्युलर सिस्ट यांसारख्या लक्षणांवर सुद्धा या उपचारांचा छान उपयोग होतो. लॅपारोस्कोपीद्वारे ट्यूबल ब्लॉक कधी-कधी निघतात; पण लॅपारोस्कोपी करून सुद्धा न निघालेले ब्लॉक्स या उपचारांनी निघतात.

आहारामध्ये सॅलडस् खूप घ्यावेत. फळ, मोड आलेले पदार्थ भरपूर घ्यावेत. पाणी कमीत कमी 3 ते 4 लिटर दिवसभरात प्यायल्याने उष्णता नियंत्रित होते. कमीत कमी तळलेले व भाजलेले पदार्थ घ्यावेत. मांसाहाराच्या पचनादरम्यान ‘डायोक्सिन’ हा उपपदार्थ तयार होतो. डायोक्सिन ओव्हयुलेशन प्रक्रियेमध्ये बाधा आणू शकतो. कच्चे किंवा उकडलेले शेंगदाणे, ऑलिव्ह ऑईल, जवस बी यांचा उपयोग होतो. या प्रकारच्या आहारामुळे रक्ताचा हिमोग्लोबीन नॉर्मल राहतो व अम्लता टिकून राहते. ((Second infertility))

थायरॉईड हॉरमोनचे असंतुलन हे महत्त्वाचे कारण वंध्यत्वामध्ये असू शकते. जालंधर बंध व सर्वांगासन यांचा उपयोग या आजारात चांगला होतो. नियमित हळद सेवन व मध सेवन(कोष्णजलातून) केल्यास सूक्ष्मस्रोतस अवरोध निघून ऊर्जाप्रवाह नियमित होतात. जांभूळसालीचा उपयोग अनियंत्रित रक्तस्राव व आडिनोमायोसीस या विकारांमध्ये होतो. पपई, हळद, किवी यांचा उपयोग रज:हिनतेसाठी होताना दिसतो. पुरुष वंध्यत्वामध्ये शुक्राणूहीनता (Azoospermia) लैंगिक अक्षमता ही कारणे असतात. त्यावर खजूर, गूळ, बदाम, अक्रोड, इ. चा सुंदर परिणाम दिसतो.

मानसिक अस्वस्थता

सध्याच्या तणावपूर्ण जीवनशैलीत स्पर्धा, श्रद्धा व विश्वासाचा अभाव, न्यूक्लिअर फॅमिली नात्यांमधील दुरावा, सुख-दुःख सहभाग अभाव, यामुळे एकलकोंडेपणा व चिडचिड मानसिक अस्वस्थाला कारणीभूत ठरतात. नियमित ध्यान, प्रात: चलन, संगीत श्रवण, गायन, प्राणायाम, सूर्यनमस्कार, योगनिद्रा या सर्वांचा उपयोग मन: स्वास्थ्यासाठी होतो.

Back to top button