Chopped Onion In The Fridge : फ्रिजमध्ये कांदा कापून का ठेवू नये, महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी? | पुढारी

Chopped Onion In The Fridge : फ्रिजमध्ये कांदा कापून का ठेवू नये, महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी?

पुढारी ऑनलाईन डेस्क : फ्रिजमध्ये दीर्घकाळ पदार्थ ठेवून खाणे आरोग्यासाठी अपायकारक ठरु शकते. अनेकदा आपण कणिक मळून(Chopped Onion In The Fridge) ठेवतो किंवा शिजवलेले भाज्या, भात, अन्न स्टोर करून ठेवतो. अन्न खराब होऊ नये म्हणून फ्रिजचा वापर केला जातो. फ्रिजमध्ये भाज्य़ा ते दूधपर्यंत सर्व अन्नपदार्थ ठेवले जातात. या पदार्थांपैकी एख म्हणजे कांदा. कांदा कापून डब्यात बंद करून तो फ्रिजमध्ये ठेवला जातो. पण, तुम्हाला माहितीये का, फ्रिजमधील कापलेला कांदा आरोग्यास किती हानिकारक ठरू शकतो? ही महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत वाचा. (Chopped Onion In The Fridge)

संबंधित बातम्या –

सकाळी उठल्यानंतर मुलांचा डबा, नोकरीला जाण्याची घाई असते. त्यामुळे महिला घरात रात्रीच कांदा कापून फ्रिजमध्ये ठेवून देतात. तुम्ही देखील कापलेला कांदा फ्रिजमध्ये ठेवता का? पण फ्रिजमध्ये स्टोअर केलेला कांदा का खाऊ नये?

सॅलड ते लोणच्यापर्यंत स्वाद वाढवण्यासाठी कांदा वापरला जातो. कांदामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असतं, त्यामुळे कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते. चिरलेला कांदा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने बॅक्टेरियाची वाढ होते. कांदा हवेच्या संपर्कात आल्यानंतर त्यामध्ये बॅक्टेरिया वाढतात. हाच कांदा खाल्ल्यानंतर पोट बिघडू शकते आणि आरोग्यास हानिकारक ठरू शकते. मुळात कांदे फ्रीजमध्ये ठेवताना पॉलिथिन पिशवी वापरा करा. त्यामुळे कांदे ताजे राहतील.

Back to top button