Eye Care Tips : पावसाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी… | पुढारी

Eye Care Tips : पावसाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी...

पावसाळ्यात डोळ्याची योग्य रितीने काळजी घेतली नाही तर डोळ्याचा संसर्ग वाढण्याचा धोका राहतो. सामान्य रुपात डोळ्यात होणारा संसर्ग आणि त्यापासून बचाव कसा करावा यासंदर्भात उपाय इथे सांगता येईल. (Eye Care Tips)

पावसाळ्यात अन्य आजारांबरोबरच डोळ्यात संसर्ग होण्याचा धोकाही बळावतो. प्रत्यक्षात या हंगामात संसर्ग होण्याचा धोका बळावतो. या काळात आर्द्रता आणि मायक्रो जर्म्सची संख्या वाढते. त्यामुळे डोळ्यात स्टाई, फंगल इन्फेक्शन, कंजक्टिवाइटिस, डोळ्यावर सूज, डोळे लालसर होणे, डोळे कोरडे पडणे किंवा कॉर्नियल अल्सर यासारख्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात आपल्या डोळ्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. (Eye Care Tips)

कंजक्टिवायटिस (डोळे येणे) : हा सर्वात आढळून येणारा संसर्ग आहे. त्याला आपण डोळे येणे असेही म्हणू शकतो. हा आजार बाधित व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो. त्यामुळे टॉवेल, रुमाल, उशी आदी गोष्टीं एकमेकांपासून वेगळ्या ठेवाव्यात. तसेच एकमेकांच्या वस्तू, कपडे वापरू नयेत. अर्थात तीन चार दिवसांत डोळ्याची समस्या कमी होते. परंतु त्रास वाढला तर नेत्ररोग तज्ञांकडे जाणे श्रेयस्कर ठरेल. त्याचबरोबर डोळ्याला सारखा हात लावू नये. अन्यथा इन्फेक्शन होवू शकते. हाताच्या स्वच्छतेकडेही लक्ष द्या.

कॉर्नियल अल्सर : पावसाळ्यात हा आजार अनेकांना होतो. यात डोळ्याचे दुखणे वाढते. यातून पस देखील निघतो. काहीवेळा दृष्टीक्षमतेवरही परिणाम होतो. डोळ्यावर सूज येणे, खाज सुटणे, कोरडेपणा, जळजळ होणे यासारखा त्रास होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.

बचावाचे उपाय

  • हात सतत धुवत राहणे आणि संसर्गापासून वाचण्यासाठी डोळ्यानां हात लावू नये.
  • डोळे स्वच्छ करण्यासाठी कॉमन किंवा खराब टॉवेलचा वापर करू नये. दुसर्‍याचा रुमाल वापरण्याचे टाळावे. कारण यामुळे कंजक्टिवायटिस होवू शकतो.
  • पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करू नये. कारण डोळ्यात कोरडेपणा वाढू शकतो. डोळे लाल होणे आणि जळजळ होण्याचे प्रकार वाढू शकतात.
  • दररोज थंड पाण्याने डोळे धुवावेत
  • डोळ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल, खाज सुटत असेल तर डॉक्टरांना तात्काळ दाखवावे.
  • पावसाळ्यात स्विमिंग पूलचा वापर करू नये. कारण यामुळे आपल्या डोळ्यात बॅक्टेरियाचे संक्रमण होण्याचा धोका वाढू शकतो. स्विमिंग आवश्यक असेल तर पोहताना आइज मास्कचा वापर करावा.

याकडेही लक्ष द्या

  • शरिरापेक्षा आपले डोळे अधिक काम करत असतात. त्यामुळे चांगली झोप
    घेऊन डोळ्याचा थकवा दूर करावा.
  • कॉस्मेटिक म्हणजे सौंदर्य प्रसाधनातूनही डोळ्यात इन्फेक्शन वाढते. त्यामुळे त्याचा वापर करताना सावधगिरी बाळगा.
  • संगणक, मोबाईल, लॅपटॉप आदी ठिकाणी काम करताना अधूनमधून थोडा ब्रेक घ्यावा. जेणेकरून डोळ्यावर अधिक ताण पडणार नाही.

– डॉ. संजय गायकवाड

हेही वाचा;

Back to top button