पुढारी ऑनलाईन डेस्क : नागराज मंजुळेंचा दिग्दर्शक म्हणून फॅंड्री, सैराट नंतरचा तिसरा मराठी चित्रपट म्हणजे खाशाबा! (khashaba Movie ) भारताला सर्वप्रथम वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारे मराठमोळे कुस्तीपटू म्हणजे 'खाशाबा दादासाहेब जाधव' यांच्याच जीवनावर आधारीत चित्रपटाची घोषणा नागराज यांनू सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. यावेळी "खाशाबा" चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले, त्याची पहिली झलक पाहा. (khashaba Movie )
नागराज मंजुळे म्हणाले," सिनेमा हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांना या खऱ्या, अस्सल मातीतील पण जागतिक नाव कमवणाऱ्या खेळाडूची खरी ओळख लोकांपर्यंत न्यायची आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा अशा व्यक्तीमत्वाची ओळख हया चित्रपटाद्वारे जगाला व्हावी असा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे."
जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, आटपाट निर्मीत, नागराज पोपटराव मंजुळे दिग्दर्शित "खाशाबा" ह्या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि नागराज मंजुळे यांनी केली आहे. लवकरच चित्रीकरण सुरू होणार आहे.