Heart attack : ‘हार्ट अटॅक’ घाबरू नका; …झटक्यानंतरही हृदय होऊ शकते दुरुस्त | पुढारी

Heart attack : 'हार्ट अटॅक' घाबरू नका; ...झटक्यानंतरही हृदय होऊ शकते दुरुस्त

  • डॉ. अजिंक्य बोर्हाडे

हृदयविकाराच्या झटक्यानंतर हृदय कमकुवत होते आणि हृदयाचे स्नायू आणि वॉल्व्ह खराब होतात; पण आता शास्त्रज्ञांनी कमकुवत हृदय दुरुस्त करण्यासाठी संशोधन करून जेल तयार केले आहे. शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या या बायोजेलमुळे हृदय दुरुस्त होईल. या जेलच्या मदतीने हृदयविकाराच्या झटक्यानंतर हृदय दुरुस्त केले जाऊ शकते.

सध्या हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडणार्‍यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आता कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हृदयविकाराला बळी पडत आहेत. तरुणांपासून वृद्धापर्यंत सर्वच वयोगटांतील व्यक्तींसाठी हृदयविकाराचा झटका गंभीर धोका बनला आहे. अलीकडेच, ‘इका केअर’ने सध्याच्या आरोग्यासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला. हृदयविकाराच्या झटक्याने होणार्‍या मृत्यूंची संख्या पूर्वीच्या तुलनेत सातत्याने वाढत आहे, असा दावा या अहवालामध्ये करण्यात आला होता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडणार्‍यामध्ये बहुतांश तरुणांचाही समावेश आहे. त्यावर आता शास्त्रज्ञांनी एक उपाय शोधला आहे.

बायो जेल हा एक प्रकारचा घट्ट द्रवपदार्थ आहे. हे बायो जेल वापरण्यापूर्वी निर्जंतुकीकरण पाणी घालून पातळ केले जाते. हृदयविकाराच्या झटक्यानंतर रुग्णाचे हृदय कमकुवत होते. हृदयविकारामुळे हृदयाचे स्नायू आणि व्हॉल्व्ह खराब होतात. अशावेळी हे जेल हृदय दुरुस्त करण्यास मदत करते. शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार, त्याची यशस्वी चाचणी झाली असून, आता हे बायो जेल सामान्य लोकांना सहज उपलब्ध करुन देण्याबाबत काम सुरू आहे.

हृदयविकाराच्या झटक्यानंतर रुग्णावर बायो जेलचा वापर केला जातो. हे बायो जेल इंजेक्शनच्या मदतीने रुग्णाच्या शरीरात पोहोचवले जाते. शरीरात गेल्यानंतर, बायो जेल हृदयाच्या खराब झालेल्या भागांची दुरुस्ती करते. हृदयविकाराच्या झटक्यानंतर हृदयात काही क्रॅक होतात आणि रक्तवाहिन्यांचेही नुकसान होते. बायो जेल याची दुरुस्ती करते.

हे ही वाचा :

देशात २८ टक्‍के मृत्‍यू हृदयविकारामुळे ! ICMR च्‍या अहवालातील धक्‍कादायक माहिती

हृदयविकाराच्या झटक्यानंतर प्रथमच सुश्मिताचे रॅम्पवॉक (Video)

Back to top button