

पन्हाळा : पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा शहराकडे येणारा बुधवार पेठ ते पन्हाळा शहर हा मुख्य रस्ता गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे खचला आहे. रस्ता दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे शिवज्योती नेण्यासाठी रेडे घाटी अंधारबाव या मार्गाने पन्हाळ्यात यावे लागणार आहे. हा पर्यायी मार्ग फक्त दुचाकींसाठी खुला राहणार आहे. अन्य वाहने बुधवार पेठ येथे पार्किंग करावी लागणार आहेत. असे मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी सांगितले.
किल्ले पन्हाळा येथे परंपरेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव दि. 2 मे रोजी साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शिवजयंती उत्सव नियोजनासंदर्भात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला प्रशासक तथा मुख्याधिकारी स्वरूप खारगे, पोलिस निरीक्षक अरविंद काळे, यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
पन्हाळा शहराकडे येणारा बुधवार पेठ ते पन्हाळा शहर हा मुख्य रस्ता गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे खचला आहे. रस्ता दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे शिवभक्तांनी सुरक्षिततेच्या द़ृष्टीने हा रस्ता दि. 1 मे रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 2 मे रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतूक व पायी चालत जाण्याकरिता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.