

पुढारी ऑनलाईन डेस्क : केसांची वाढ, झडने, केसांच्या अनेक समस्यांपासून नागरिक हैराण असतात. त्याच्या देखभालीसाठी भरमसाठ पैसाही खर्च करतात. काही लोक टक्कल आणि पांढऱ्या केसांच्या समस्येवर बराच पैसा खर्च करत असतात. यासाठी लोक महागडी औषधे आणि सौंदर्य प्रसाधने वापरतात; पण समाधानकारक रिझल्ट येत नाही. (Benefits Jaggery Fenugreek) यावर घरगुती इलाज अतिशय उपायकारक आहेत.
आपल्या नेहमी वापरातील गुळामुळे केसांच्या बऱ्याच समस्या कमी होत आहेत. केसांना काळे ठेवण्यासाठी गुळाचे सेवन केल्यास नक्कीच आपल्या शरीरावर चांगला फायदा होतो. गुळाला आपल्या आहारात पुराण काळापासून महत्व देण्यात आले आहे. गुळाचे आपल्या आरोग्याला खूप फायदे आहेत. साखरेपेक्षा सेंद्रिय गुळाचा दैनंदिन जीवनात वापर केल्यास अनेक आजारांतही ताे गुणकारक ठरताे.
मेथीच्या बिया केसांवर कायम उपयुक्त ठरल्या आहेत. दरम्यान गुळाचे आणि मेथीच्या बियांचे मिश्रण केसांवर अधिक प्रभावी आहे. मेथी बियांची पावडर करायचे आहे. रोज सकाळी गुळ आणि मेथीच्या बियांचे मिश्रण पाण्यातून घ्यायचे. ही प्रक्रिया तुम्ही कायम ठेवल्यास तुमचे केस काळे राहण्यास मदत हाेते.
मेथीच्या बियांचा वापर अनेक प्रकारे होतो. केसांसाठी मेथीची पूड आणि गुळाचे सेवण केल्यास फायदा होतो; पण मेथीच्या बियांचे अन्य फायदे ही आहेत. मेथीच्या बियां टाकून पाणी उकळून घ्या. या पाण्याने केस धुवा आणि दहा मिनिटे तसेच राहू ठेवा. दहा मिनिटांनी केस साध्या पाण्याने धुवा. याचबरोबर रात्री भिजवलेल्या मेथीच्या बियांची पेस्ट बनवा. यामुळे केसांना शायनिंग येते.
याचबरोबर खोबरेल तेलात मेथी पावडर घाला. हे तेल चांगले गरम करा. यानंतर तेल थंड करून लहान मुलांना याची मसाज केल्यास बाळ सदृढ बनते. तसेच केसातील कोंडा कमी करण्यासाठी खोबरेल तेल आणि मेथी पावडरचा वापर केल्यास फायदा होतो. याने केस देखील मजबूत होतात.
हेही वाचलं का?