Palak Baji : पालकची पातळ भाजी कशी कराल? | पुढारी

Palak Baji : पालकची पातळ भाजी कशी कराल?

पुढारी ऑनलाईन डेस्क

आपलं आरोग्य तंदुरुस्त ठेवायचं असेल तर डाॅक्टर पालेभाज्या खा, हा पहिल्यांदा सल्ला देतात. कारण, पालेभाज्यांमधून शरीराच्या अनेक व्याधी कमी होऊ शकतात. भाज्या खाणं शरीरासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आज पालकाची पातळी भाजी (Palak Baji) सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत. चला पालकाची पातळ भाजीचे रेसिपी पाहू या…

साहित्य

१) पालक भाजीची चिरलेली एक जुडी

२) पाव वाटी तेल

३) पाच-सहा सुक्या मिरच्या

४) अर्धा चमचा तिखट

५) चमचाभर गूळ

६) अर्धा वाटी हरभरा डाळीचं पीठ

७) पाच-सहा लसणाचा पाकळ्या

कृती 

१) पहिल्यांदा मध्यम गॅसवर कढई ठेवून घ्या. त्यात थोडं तेल घालून फोडणी टाका.

२) फोडणी टाकल्यानंतर त्यात तिखट, मीठ, गूळ घाला. त्यात चिरलेली पालकची भाजी (Palak Baji) घालून वाफलून घ्या.

३) त्यानंतर दोन वाटी डाळीचं पीठ कालवून भाजीत घाला आणि एक उकळी येऊ द्या.

४) पुन्हा गॅसवर एक भांडं ठेवून त्यामध्ये ठेचलेला लसूण आणि सुक्या लाल मिरच्यांची फोडणी करून ती भाजीवर घाला.

अशापद्धतीने तुमची खमंग पालकची पातळ भाजी तयार झाली आहे. इथं एक लक्षात घ्यावं लागेल की, हरभरा डाळीचं पीठाऐवजी डाळीचा भरडादेखील वापरला जातो. त्यामध्ये जाडसर रव्यासारखी डाळ दळून आणली जाते.

पहा व्हिडीओ : कोल्हापुरात का वाढतायत मटणाचे दर ?

या रेसिपीज वाचल्या का?

Back to top button