Health tips : निस्तेजता आणि अकाली वार्धक्य आलंय; जाणून घ्या आयुर्वेदीक उपाय

Health tips : निस्तेजता आणि अकाली वार्धक्य आलंय; जाणून घ्या आयुर्वेदीक उपाय
Published on
Updated on

रोगाचे नाव : निस्तेजता, अकाली वार्धक्य.

गुरुकुल पारंपरिक उपचार : सुवर्णमाक्षिकादि वटी, चंद्रप्रभा आणि शृंगभस्म प्रत्येकी तीन गोळ्या, सकाळी आणि सायंकाळी रिकाम्या पोटी 3 चमचे कृष्मांडपाकाबरोबर घ्याव्या. भोजनोत्तर अश्वगंधारिष्ट घ्यावे. मधुमेह असल्यास कुमारी आसव किंवा फलत्रिकादि काढा 4/4 चमचे जेवणानंतर घ्यावा. मधुमेह नसल्यास सकाळी आणि सायंकाळी च्यवनप्राश किंवा अश्वगंधापाक घ्यावा. कृश व्यक्तीने रात्री अश्वगंधा चूर्ण एक चमचा घ्यावे. पोटात वायू धरत नसल्यास, शारीरिक श्रम जास्त असताना लाक्षदि गुग्गुळ, लाक्षादिघृत किंवा शतावरीघृत दोन वेळा घ्यावे. शुक्रक्षयामुळे निस्तेजता आली असल्यास अश्वगंधाघृत दोन चमचे; लक्ष्मीविलास 3 गोळ्या, मधुमालिनीवसंत 6 गोळ्या, अशी औषधे दोन वेळा घ्यावीत. (Health tips)

संबंधित बातम्या 

ज्यांना फार खर्च परवडत नाही, त्यांनी आस्कंद, वाकेरी, भुई कोहळा, चोपचिनी आणि शतावरी या औषधांचे एकत्रित चौगुण चूर्ण एक चमचा दोन वेळा घ्यावे. आर्थिक स्थिती चांगली असणार्‍यांनी धात्री रसायन दोन चमचे आणि पुष्टी वटी 2 गोळ्या दोन वेळा खाव्यात.
ग्रंथोक्त उपचार : च्यवनप्राश, अश्वगंधापाक, शतावरी घृत, आस्कंदचूर्ण, चंद्रप्रभा, शृंगभस्म, द्राक्षासव, चंदनबलालाक्षादि तेल, मधुमालिनीवसंत, लक्ष्मी विलास, कुष्मांडपाक.

Health tips : विशेष दक्षता आणि विहार 

माफक सूर्यप्रकाश आणि किमान व्यायाम अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर अतिश्रम, उष्णतेशी खूप काम, जागरण, कमी पोषण, कदन्न, व्यसन टाळावयास हवे.

पथ्य : सकस अन्न, उडीद, मूग, हरभरा अशी टरफलासकट कडधान्ये, पालेभाज्या, फळे, दूध, माफक मीठ आहारात असावे. जेवण सावकाश चावून खावे. जेवणात व्यवस्थित अंतर असावे.

कुपथ्य : आंबवलेले पदार्थ, फार खारट, आंबट पदार्थ, लोणचे, पापड, दही, फाजील मीठ, लिंबू, चिंच, कैरी, फरसाण, मिठाई, बेकरीचे पदार्थ कोल्ड्रिंक, कृत्रिम पेये टाळावीत.

योग आणि व्यायाम : किमान सहा सूर्यनमस्कार, फिरणे, पोहणे, दोरीच्या उड्या.

रुग्णालयीन उपचार : कुटिप्रावेशिक तत्त्वावर रसायन प्रयोग, चंदनबलालाक्षादि तेलाचे अभ्यंग.

अन्य पष्ठी उपक्रम (पंचकर्मादि) : दूध किंवा साळीच्या लाह्यांचा पाण्याचा बृंहण बस्ती.

चिकित्साकाल : सहा आठवडे ते तीन महिने.

निसर्गोपचार : अनम्ल, अलवण असा माफक आहार वेळेवर घेणे, वेळेवर झोप.

अपुनर्भवचिकित्सा : कुष्मांडपाक, च्यवनप्राश, सुवर्णमाक्षिकादिवटी, द्राक्षारिष्ट, कुमारी आसव.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news