Horoscope Today : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार २० फेब्रुवारी २०२४

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on
Updated on

चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.  (Horoscope Today)

मेष : आज तुम्‍ही मित्र आणि नातेवाईकांच्या संपर्कातून नवीन अनुभव मिळतील. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. मालमत्तेसंबंधीचे वाद मध्यस्थीने सोडवले जाऊ शकतात. कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. याचा तुमच्‍या प्रतिष्ठेवर परिणाम होऊ शकतो. आळस टाळा. तुम्ही कुटुंबासाठी थोडा वेळ द्‍या. आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

वृषभ : आज कोणत्याही परिस्थितीत तुमचे काम पूर्ण करण्‍याच्‍या मनस्‍थितीत असाल. प्रलंबित काम किंवा उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नातेवाईकांच्या सहकार्यानेही अनेक समस्या सुटतील. जेव्हा एखादी समस्या येते तेव्हा इतरांना दोष देण्याऐवजी स्वतःच्या कार्य क्षमतेचा विचार केला पाहिजे, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायात काही अडचणी येतील. घरातील वातावरण आनंदी राहिल. थकवा जाणवेल. (Horoscope Today)

मिथुन : श्रीगणेश सांगतात की, आज महत्त्वाच्या मुद्यांवर गोंधळ झाल्यास जवळच्या व्यक्तीशी चर्चा करा, तुम्हाला योग्य सल्ला मिळेल. काळ अनुकूल आहे. वैयक्तिक कामातील व्‍यस्‍ततेमुळे नातेवाईकांकडे दुर्लक्ष करू नका. मुलांच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मंदीच्या व्यावसायिक कामांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. वैवाहिक जीवन मधुर राहिलं.

कर्क : काही काळापासून सुरू असलेल्या एखाद्‍या समस्येवर तोडगा मिळाल्‍याने दिलासा मिळेल. मालमत्तेशी संबंधित कामात काही अडचणी येऊ शकतात. प्रतिभेच्‍या जोरावर तुम्ही परिस्थितीवर उपाय शोधू शकाल. आर्थिक बाबींवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ध्यान केल्याने मानसिक आराम मिळेल. कर्मचाऱ्यांनी कामांकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

सिंह : श्रीगणेश सांगतात की, आज सामाजिक कार्यात सहभागी व्‍हाल. घरातील स्‍वच्‍छता आणि सुविधांच्‍या कामात तुम्ही व्यस्त असाल. कोणतेही काम करण्यापूर्वी पूर्ण माहिती घेवूनच निर्णय घ्‍या. अनुभवाच्या अभावामुळे काही कामे अपूर्ण राहू शकतात. सरकारी नोकरीशी संबंधित कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. यावेळी सध्याच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. (Horoscope Today)

कन्या : आज ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. आत्मविश्वास कायम राहील. प्रयत्न केल्याने एखाद्याचे इच्छित काम पूर्ण होऊ शकते, असे श्रीगणेश सांगतात. मुलांच्‍या कार्यात सहभागी झाल्‍याने तुम्हाला आनंद मिळेल. कोणाचाही कामात हस्तक्षेप करू नका. तसेच कोणालाही अनावश्यक सल्ला देऊ नका. कोणत्याही विषयावर निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीशी संबंधित कागदपत्रांची योग्य तपासणी करा. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्यासंबंधी किरकोळ समस्या उद्भवू शकतात.

तूळ : आज तुमची प्रलंबित कामे एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने पूर्ण करता येतील. तुमची प्रतिभा आणि योग्यता यांच्याशी संबंधित आवडीच्या कामांमध्ये वेळ जाईल. त्यामुळे मानसिक शांती मिळेल. ग्रहांची स्थिती फारशी अनुकूल नाही. कोणतीही नवीन गुंतवणूक किंवा नवीन नोकरीसाठी योग्य परिश्रम करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. वैवाहिक जीवनात मधुरता येईल. पित्ताचा त्रास होण्‍याची शक्‍यता.

वृश्चिक : आज ज्येष्ठ लोकांच्या सहवासात थोडा वेळ घालवल्याने तुमच्या विचारसरणीतही सकारात्मक परिणाम होतील, असे श्रीगणेश सांगतात. कठीण प्रसंगांवर मात कराल. नात्यात काही मतभेद असू शकतात. शेजाऱ्यांशी कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका. हा काळ शांततेत घालवला पाहिजे. व्यवसायात कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. घरामध्ये योग्य सुव्यवस्था राखली जाईल. कामाच्या जास्त ताणामुळे थोडा थकवा जाणवू शकतो.

धनु : आज वेळेनुसार दैनंदिन दिनचर्या बदलणे आवश्यक असल्याचे श्रीगणेश सांगतात. त्यामुळे विचारांमध्ये सकारात्मकता येईल. तरुणांना करिअरशी संबंधित स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहाराशी संबंधित कोणतीही निर्णय घेवू नका. एकांतात किंवा धार्मिक ठिकाणी थोडा वेळ व्‍यक्‍तित करा . इलेक्ट्रिकल वस्तूंशी संबंधित व्यवसायात काही नुकसानीची परिस्थिती असू शकते. पती-पत्नीमधील संवाद वाढेल. अचानक आलेल्या समस्येमुळे तणाव आणि चिंता वाढू शकते.

मकर : आज काही काळापासून सुरू असलेली कोणतीही चिंता दूर होईल, असे श्रीगणेश सांगतात. तुमची संपर्क सूत्रे मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करा. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन तुमचा विचार आणि आत्मविश्वास मजबूत करेल. बोलण्‍यावर नियंत्रण ठेवा. कोणताही व्यावसायिक निर्णय विचारपूर्वक घ्‍या. वैवाहिक जीवन आनंदी होऊ शकते. जोखीम घेणे टाळा.

कुंभ : आज कोणताही वैयक्तिक निर्णय घेण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती मिळवणे आवश्‍यक ठरेल. यामुळे कोणत्याही प्रकारची चुकीपासून तुमचा बचाव होईल. मुलांशी वागताना त्यांच्या दृष्टिकोनातून पाहणे योग्य ठरेल. शत्रुपक्षाशी संबंधात वादाची परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका. व्यावसायिक कार्यात यश मिळविण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागतील, असे श्रीगणेश म्‍हणाले.

मीन : आज उधार दिलेले पैसे परत मिळवू शकतील. भावंडांशी संबंध मधुर होतील. धार्मिक किंवा अध्यात्मिक कार्यात तुम्हाला एक अद्भुत शांती मिळेल.इतरांना भेटताना आपल्या प्रतिष्ठेची देखील काळजी घ्या. व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये अधिक माहितीपूर्ण आणि सावध निर्णय घ्या. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा, असे श्रीगणेश सांगतात.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news