WhatsApp Update : वेब व्हॉट्सॲपने आणले ‘हे’ नवे फिचर

WhatsApp Update : वेब व्हॉट्सॲपने आणले ‘हे’ नवे फिचर

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेब व्हॉट्सॲपने डेस्‍कटाॅप वापरकर्त्याचे चॅटिंग सुरक्षित करण्यासाठी सतत काम करत असते. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲपने एका नवीन फिचरची चाचणी करत होते. आता हे फिचर लवकरच व्हॉट्सॲप मोबाईलसारखेच आता डेस्‍कटाॅप युजर्सनाही वापरता येणार आहे. जाणून घेवूयात व्हॉट्स ॲपच्या या नवीन फिचर बद्दल… (WhatsApp Update)

WABetaInfo अहवालात व्हॉट्सॲपमधील नवीन अपडेटबद्दलची माहिती दिली आहे. अहवालात म्हटले आहे की, व्हॉट्सॲपच्या वेब आवृत्तीमध्ये लवकरच "चॅट लॉक" हे फिचर दिले जाणार आहे. या फिचर चिन्ह एका लहान पॅडलॉकसारखे आहे. हे आपल्याला ॲपच्या साईडबारमध्ये दिसणार आहे. व्हॉट्सॲप युजर्स आपले सिक्रेट चॅट्स या नवीन फिचरच्या साहाय्याने लॉक केलेल्या फोल्डरमध्ये ठेवू शकतात. (WhatsApp Update)

काय आहे Whatsapp चॅट लॉक फीचर ?

WhatsApp मधील चॅट लॉक हे एक नवीन फिचर आहे. या फिचरच्या माध्यमातून आपण आपले सिक्रेट फोटो आणि चॅटिंग सुरूक्षित ठेवू शकतो. या फिचरच्या सहाय्याने आपले वैयक्तिक चॅट लॉक करू शकता आणि त्यांना एका विशेष फोल्डरमध्ये ठेवू शकता. एखादा चॅट लॉक केल्यानंतर ते चॅटिंग नियमित चॅट स्क्रीनवर दिसणार नाही. त्याऐवजी ते लपविलेल्या फोल्डरमध्ये दिसेल. या लॉक केलेल्या चॅट्समध्ये प्रवेश करण्यासाठी फोनचा पासवर्ड किंवा सुरक्षित पासकोड वापरावा लागणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news