जेवणाची चव वाढवण्यासाठी बनवा शेंगदाण्याची चटणी | पुढारी

जेवणाची चव वाढवण्यासाठी बनवा शेंगदाण्याची चटणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : उन्हाळ्याच्‍या दिवसात महिला वर्गाची तिखट, वेगवेगळ्या प्रकारचे पापड, सांडगे, शेवया बनवण्यासाठी धावपळ सुरु असते. याचकाळात मुलांच्या शाळांना सुट्या लागल्याने त्याचीही घरातील लूडबूडही वाढते. दरम्यान घरातील प्रत्येकाला वेगवेगळ्या पदार्थाची चव चाखायला आवडते. अशावेळी जेवणासोबत तोडी लावायला शेंगदाण्याची चटणी असेल तर कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही. जाणून घेवूयात शेंगदाण्यांची चटणी कशी बनवायची…

साहित्य-

भाजलेले शेंगदाणे – २ वाटी
हिरवी मिरची – ५ नग
लसुण – जवळपास ३० पाकळ्या
जीरे – एक चमचा
धने पावडर – २ चमचा
लाल तिखट – १ चमचा
मीठ- चवीनुसार
तेल- फोडणीपुरते

Dry Peanut Chutney Mahrashtrian Style | Aarti Atma Ram

कृती-

शेंगदाण्याची चटणी

१. पहिल्यांदा एका कढाईत थोडे तेल घालून मंद गॅसवर दोन वाटी शेंगदाणे ५ ते १० मिनिटापर्यत भाजून घ्यावेत.

२. एका मिक्सरच्या भांड्यात १० -१२ लसणाच्या पाकळ्या, भाजलेले एक वाटी शेंगदाणे, एक चमचा लाल तिखट, एक चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालावे.

३. यानंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. (मिश्रण खूपच बारीक वाटू नये.)

४. मंद आचेवर कडाईत थोडं तेल घालून यात अर्धा चमचा जिरे घालावे.

५. जिरे परतून घेतल्यानंतर त्यात बारीक केलेल्या शेंगदाण्याचा कूट घालावा.

६. एक मिनिटांपर्यत शेंगदाण्याची चटणी चांगली भाजून घ्यावी.

७. यानंतर तयार होईल शेंगदाण्याची लाल चटणी.

शेंगदाण्याची हिरवी चटणी | प्रवासामध्ये अगदी महिनाभर टिकणारी | Shengdanachi Hirvi Chutney Recipe - YouTube

शेंगदाण्याची हिरवी चटणी

१. एका कढाईत तेल घालून त्यात अर्धा चमचा जिरे, ५ हिरव्या मिरच्या, १०- १२ लसणाच्या पाकळ्या चांगल्या भाजून घ्याव्यात.

२. मिक्सरच्या भांड्यात भाजलेले मिश्रण, एक वाटी शेंगदाणे, एक चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालावे.

३. हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्यावे.

४. यानंतर जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी शेंगदाण्यांची हिरवी चटणी खायला घ्या. ( Shengdana chutney )

हेही वाचा : 

Back to top button