Gudi Padwa Special : गुढीपाडव्याला कडूलिंबाच्या पानांचा प्रसाद असा बनवा | पुढारी

Gudi Padwa Special : गुढीपाडव्याला कडूलिंबाच्या पानांचा प्रसाद असा बनवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : चैत्र पाडव्याला आपण घरोघरी गुढी उभारून मराठी नववर्षाला मोठ्या उत्साहात सुरुवात करतो. यंदाचा गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष २२ मार्च रोजी सर्वत्र साजरा होत आहे. या दिवशी घरातील वातावरण प्रसन्न ठेवत असून सर्वजण आपआपल्या दारात गुढ्या उभारून त्याचे पूजन करतात. यावेळी खास करून पुरणपोळीचा बेत आखला जातो. सोबतचं नैवेद्यासाठी कडूलिंबाच्या पानांचाही वापर केला जातो. कडूलिंबाच्या पाने आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असल्याने या दिवशी त्याचे सेवन केले जाते. कडूलिंबाच्या पानांचा प्रसाद कसा बनवायचा ते जाणून घेऊया…( Gudi Padwa Special )

साहित्य-

कडूलिंबाची पाने- १० ते १५
हरभरा डाळ- दोन चमचा
ओवा- अर्धा चमचा
जिरे- अर्धा चमचा
वाळलेले खोबरे- बारीक २-४ तुकडे
गुळ किंवा साखर – एक चमचा
चिंच- ३-२ तुकडे
मध- अर्धा चमचा

कृती –

१. पहिल्यांदा दोन चमचे हरभरा डाळ ४- ५ तास स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवावी.

२. यानंतर कोवळी कडूलिंबाची पाने स्वच्छ धुवून घ्यावी.

३. मिक्सरच्या भांड्यात हरभरा डाळ, कडूलिंबाची पाने, जिरे, ओवा, वाळलेलं खोबरे, गुळ किंवा साखर आणि चिंच एकत्र करून बारीक करून घ्यावे. (टिप- वाटण खूप बारीक करण्याची गरज नाही.)

४. हे मिश्रण नंतर एका वाटीत काढून घ्यावे.

५. यावर नंतर हवे असल्यास मध तुम्ही तुमच्या आवडीने घालू शकता.

६. अशा प्रकारे तुमचा कडूलिंबाच्या पानांचा प्रसाद तयार होईल.

(टिप- मिक्सरमध्ये न वाटता देखील सर्व साहित्य एकत्रित करून हा प्रसाद बनवता येतो.) ( Gudi Padwa Special )

हेही वाचा : 

Back to top button