Benifits Of Tulasi : तुळशीची पाने ठेवतील तुम्हाला एकदम फिट, असा करा वापर

तुळस
तुळस

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयुर्वेदामध्येही गुणकारी तुळशीचे मोठे योगदान आहे. घरासमोर तुळस असावी असं म्हटलं जातं. कारण, तुळसमुळे आपल्या आजुबाजूचे वातावरण शुद्ध राहते. इतकचं नाही तर अनेक आजारांपासून सुटकादेखील मिळते. (Benifits Of Tulasi ) तुळशीच्या घरात असण्याने सकारात्मक उर्जा मिळते. तुम्हाला माहित आहे का, तुळशीची काही पाने खाल्याने शरीराला खूप फायदे मिळतात. 'क्वीन ऑफ हर्ब्स' अशी ओळख असमारी तुळस आपल्या घरात असलीच पाहिजे. सर्दी, खोरला, त्वचा, केसांसाठी अशा बऱ्याच आजारांवर तुळस उपयुक्त ठरते. (Benifits Of Tulasi )

तुम्ही तणावात असाल तर तुळशीची पाने चावून खा. तुळशीच्या वाळलेल्या मंजिऱ्या तळहातावर घासून त्याचा वासदेखील घेऊ शकता. तसेच तुळसमधील अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल, अॅन्टी इन्फ्लेमेट्री तत्त्व साथीच्या आजारापासून दूर ठेवते.

तुळस शरीरातील युरिक अॅसिड कमी करून किडनी स्टोनला हळूहळू नष्ट करते.

तुम्हाला शरीरावर सूज येत असेल तर ती सूज कमी करण्यासाठी तुळस उपयुक्त ठरते.

प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही तुळस खूप प्रभावी आहे.

तुम्ही तुळशीची पाने रात्रभर पाण्यात टाकून सकाळी ते पाणी पिऊ शकता. मुख्य म्हणजे आरोग्य चांगले राहण्य़ासाठी हे पाणी तुम्ही रोज प्यायला तरी हरकत नाही.

ताप, सर्दी-खोकला यासारखे आजार तुळस दूर करते.

तुळशीची तीन-चार पाने उकळलेल्या दुधातून घेतल्यास डोकेदुखू कमी येते.

तुळशीच्या पानांमध्ये पोटॅशिअम आणि फॉलेट असते. ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.

निरोगी हृदयासाठी रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन करा.

तोंडाला दुर्गंध येत असल्यास तीन-चार पाने चघळावे.

तुळशीच्या पानांमध्ये असे गुणधर्म असतात जे कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करतात.

तुम्हाला पोट साफ होत नसेल तर सकाळी रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन करा. यामुले तुमची पचनसंस्था निरोगी राहील.

ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांनी तुळशीची पाने टाकून पाणी प्यावे. तुळशीच्या पानांमध्ये बॉडी डिटॉक्स करण्याची क्षमता असते. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.

त्वचेवर भाजले असेल तर भाजलेल्या जागी तत्काळ तुम्ही तुळस पानांचा रस काढून लावू शकता. यामुळे जखम चिघळणार नाही आणि जंतूसंसर्गही होणार नाही. सिवाय त्वचेवर भाजलेला डागही राहणार नाही.

चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स जाण्यासाठी तुळस पानांचा रस किंवा लेप उपयुक्त ठरतो.

शरिरातील प्लेटलेट्स वाढविण्यासाठी तुळस फायदेशीर ठरते.

थकवा दूर करण्यासाठीही तुळशीची पाने चावून खा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news