Cardiovascular : मध्‍यम वयातील मेंदूचे आजार ठरतात घातक, जाणून घ्‍या नवीन संशोधनातील माहिती | पुढारी

Cardiovascular : मध्‍यम वयातील मेंदूचे आजार ठरतात घातक, जाणून घ्‍या नवीन संशोधनातील माहिती

पुढारी ऑनलाईन : मध्यम वयात होणारे मेंदूचे आजार हे वृद्धपकाळात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी (Cardiovascular) आजारांशी संबंधित असतात, असे अमेरिकेत करण्‍यात आलेल्‍या नवीन संशोधनात स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे. अमेरिकन ॲकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीच्या ऑनलाईन न्यूरोलॉजी वैद्यकीय जर्नलमधील हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

वयाेवृद्ध व्यक्तींमध्ये हृदयविकार, स्ट्रोक यांसारखे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी (Cardiovascular) रोग आढळून येणे हे मध्यम वयातील मेंदूशी संबंधित कमजोरी आणि स्मृतीभ्रंश या आजारांशी संबंधित असल्याचे या संशोधनात नमूद करण्‍यात आले आहे. मध्यम वयातील कमी आकलनशक्ती आणि मेंदूच्या आजारांचा परिणाम हा उतरत्या वयात म्हणजे वयाच्या ६० वर्षानंतर कसा जाणवतो, हे या  संशोधनातून स्पष्ट करण्यात आले आहे.

कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, सॅन फ्रान्सिस्क येथील Xiaqing Jiang यांनी आपल्‍या संशोधनात म्‍हटले आहे की, मध्यम वयातील बौद्धिक आकलनशक्ती, आकलनशक्ती कमी होणे आणि मेंदूच्या इतर आरोग्याशी संबंधित आजार हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या घटनांशी संबंधित (Cardiovascular) असतात. वयाच्या ६० वर्षापूर्वी बौद्धीक आकलनशक्ती आणि मेंदू विविध आजारांमुळे उर्वरीत आयुष्यात कसा परिणाम होतो याबद्दल लोकांना कमी माहिती असल्याचेही या अभ्‍यासात म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button