Rahu Gochar : २०२३ मध्ये राहू कोणाला करणार मालामाल? कोणाचे चमकणार नशीब | पुढारी

Rahu Gochar : २०२३ मध्ये राहू कोणाला करणार मालामाल? कोणाचे चमकणार नशीब

पुढारी ऑनलाईन डेस्क : वैदिक ज्योतिषात राहुला मुख्य ग्रह न मानता छाया ग्रहाच्या रूपात मान्यता देण्यात आली आहे. राहू आणि केतुची आपली कुठली राशी नाही. परंतु, राहुला शनी समान आणि केतुला मंगल समान फळ देणारा म्हटलं गेलं आहे. (Rahu Gochar) ज्योतिषाच्या आणखी एका सूत्रानुसार, जर कुंडलीमध्ये बुध मजबूत असेल तर राहू अशुभ फळ देत नाही. जर गुरु मजबूत असेल तर केतुचे अशुभ फळ कमी प्रकट होतात. राहू केतू ज्या राशीत राहतात, त्या (Rahu Gochar) राशीच्या स्वामीनुसार फळे देण्याचे काम करतात. यासाठी राहू केतुला मायावी ग्रह म्हटलं जातं. राहू आणि केतू ३० ऑक्टोबर २०२३ ला राशी परिवर्तन करतील.

वृषभ राशी – या राशीच्या लोकांसाठी राहुचे संक्रमण लाभदायक ठरणार आहे. अकराव्या घरात राहुचे संक्रमण शुभ असणार आहे. तुम्हाला मित्रांचे सहकार्य लाभणार आहे. जे लोक अनेक दिवसांपासून स्वत:चा व्यवसाय उभारण्याच्या प्रयत्नात होते त्यांना आता मदत मिळेल. राहुची दृष्टी तुमच्या तिसऱ्या, पाचव्या, सातव्या स्थानी राहील. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मदत मिळेल. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्या लागतील. कुठलाही तणाव होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

तूळ राशी – या राशीच्या लोकांसाठी सहाव्या घरातून राहुचे संक्रमण आहे. राहुचे संक्रमण तुमच्या आयुष्यात वरदानापेक्षा कमी नाही. तुम्हाला नोकरीत चांगल्या संधी मिळेल. भविष्यात नोकरीची मोठी ऑफर मिळू शकते. राहुच्या कृपेने राजकारणाशी संबंधित लोकांना यश मिळेल. तुम्हाला मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. परदेशात जाण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कौटुंबिक वादात न पडलेले चांगले.

मकर – या राशीच्या लोकांसाठी तिसऱ्या घरातून राहुचे संक्रमण राहील. राहुच्या संक्रमणाने तुमची हिंमत वाढेल. नशीब साथ देईल. माध्यम, लेखन आणि जनसंवादाशी संबंधित लोकांच्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण बदल दिसून येतो. यावेळी, कामाच्या संदर्भात केलेला प्रवास फायदेशीर ठरेल. व्यापारी वर्गाला चांगला फायदा होऊ शकतो. मित्र तुमची मदत करतील. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

हे ही वाचा :

Shukra Gochar 2022 : शुक्राची बदलती ‘चाल’ या राशी होतील ‘मालामाल’

Shukra Gochar 2022 : शुक्राचा गुरुच्या राशीत लवकरच प्रवेश, ‘या’ राशींच्या लोकांवर पडणार पैशांचा पाऊस!

Back to top button