पुढारी ऑनलाईन डेस्क : मानवी शरीरात व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B 12) तयार होत नसल्यामुळे पौष्टिक आहाराद्वारे ते मिळवावे लागते. प्रामुख्याने अंडी, चिकन, मांस यांमधून व्हिटॅमिन बी 12 जास्त प्रमाणात मिळते. सध्या शाकाहारी लोकांना व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचा सामना करावा लागतो.
व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B 12) हे केवळ आपल्या शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचे आहे. बी 12 जीवनसत्वामुळे मेंदू आणि मज्जासंस्था दोन्ही निरोगी राहतात. नर्व्ह सिस्टीम सुरळीत चालू राहण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 खूप महत्वाचे आहे. याशिवाय, लाल रक्त पेशींच्या निर्मितीमध्ये व्हिटॅमिन बी 12 महत्वाची भूमिका बजावते. हाडे मजबूत राखण्यासाठी आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 आवश्यक असते. मांसाहार करणाऱ्या लोकांसाठी अंडी, मासे आणि सीफूड असे अनेक घटक आहेत, ज्यांमधून व्हिटॅमिन बी 12 सहज मिळू शकते. परंतु जर तुम्ही शाकाहारी असाल, तर तुम्हाला बी 12 ची कमतरता जाणवते. शाकाहारी लोकांसाठी अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा आहारात नियमित समावेश करून तुम्ही व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करू शकता.
दुधापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करण्याची क्षमता असते. लो फॅटच्या दह्याने तुम्ही B12 आणि B1, 2 ची कमतरता पूर्ण करू शकता. यासोबतच पचनक्रियाही व्यवस्थित राहते. दूध हे संपूर्ण अन्न आहे. प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन 12 ची कमतरता पूर्ण करण्यासाठी चीज हा देखील एक चांगला पर्याय आहे.
बाजारात सोया चंक्स (शाकाहारी मटन) उपलब्ध असतात. सोयाबीनचे आपण वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकता. जसे की भाजी, पुलाव करूनही सोयाबीनचा आहारात समावेश करू शकता. सोयाबीनचे पीठही सहज मिळते. सोया मिल्क किंवा सोया पफ देखील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढू शकतात.
आपण डायटींग करीत असाल तरी व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता भरुन काढू शकता. ओट्स हे असे अन्न आहे ज्यामध्ये फायबर देखील भरपूर असते आणि ते डायटिंग करणाऱ्यांसाठी देखील उपयोगी आहे.
ब्रोकोली भाजी किंवा सॅलड म्हणून खा. ब्रोकोली आरोग्यासाठी दोन्ही प्रकारे फायदेशीर आहे. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करण्यासोबतच ब्रोकोली फोलेटची कमतरता देखील पूर्ण करते आणि हिमोग्लोबिनही वाढवण्यास मदत करते.
मशरूम खाल्ल्याने व्हिटॅमिन 12 सोबत प्रोटीन, कॅल्शियम आणि लोह देखील चांगल्या प्रमाणात मिळते. त्यात बीटा ग्लुकॉन्स देखील असतात, जे शरीराला चांगले पोषण देतात.
बीट हे व्हिटॅमिन बी 12 चे भांडार म्हणूनदेखील ओळखले जाते. बीटमध्ये लोह तर असतेच, शिवाय फॉलिक ॲसिडही असते. म्हणूनच, तज्ज्ञ निरोगी आणि पौष्टिक आहारासाठी आपल्या दैनंदिन आहारात बीटचा समावेश करण्याचा सल्ला देतात.
हेही वाचा