पुढारी ऑनलाईन डेस्क : दोन वर्षांपूर्वी कोराना विषाणूचे संकटाने संपूर्ण जगाच्या जीवनशैलीवर प्रहार केला. दररोज मैदानातवर खेळणारी आणि घरात बागडणारी मुलं घरात बंदिस्त झाली. ( Child Mental Health ) आज आपण कोरोनाच्या भयातून पूर्णपणे सावरत आहोत. मात्र मागील दोन वर्षांमध्ये मुलांच्या शारीरिक वाढीबरोबर मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला असल्याचे अनेक संशोधनात स्पष्ट झाले आहे. कोरोनामुळे मुलं घरात कोंडली गेली. याचा मोठा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर झाला आहे. मानसिक आरोग्यावर नेमका कसा परिणाम झाला याचे थेट मोजमाप करता येत नाही.अलिकडे मुलांचा मूड सारखा बदलत आहे. तसेच त्यांच्या एकाग्रतेवरही मोठा परिणाम झाला असल्याचे तक्रारीमध्ये वाढ होताना दिसत आहे. युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रेन्स इमर्जन्सी फंड (युनिसेफ) ने केलेल्या अभ्यासात या समस्येवर मात करण्यासाठीचा एक उपाय सूचविण्यात आला आहे. याविषयी जाणून घेवूया…
२०२१ मध्ये युनिसेफने केलेल्या अभ्यासात म्हटलं आहे की, साथीचे आजार हे मानवच्या मनावर दीर्घकाळ परिणाम करणारे ठरु शकतात. कोविड-१९ साथीचा मानसिक प्रभाव अनेक वर्ष जावण्याची शक्यता आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या पाहणीत १० ते १९ वयोगटातील ७ पैकी एका मुलाला मानसिक विकार आहे. विशेषत: किशोरवयीन मुलांमध्ये ही समस्या सर्वाधिक आठढळत आहे. मानसिक विकारामुळे जगभरात सुमारे ४६ हजार किशोरवयीन मुलं आपलं जीवन संपवतात. मुलांना मुड सतत बदलत असेल तर पालकांनी याकडे दुर्लक्ष करणे धोक्याची घंटा ठरु शकते
युनिसेफने केलेल्या संशोधनात तज्ज्ञांना आढळलं की, कोरोना महामारी काळात मुलांच्या मानसिक आरोग्यावर झालेला परिणाम हा अनेक वर्ष टिकण्याचा धोका आहे.१८ वर्षांखालील मुले विविध मानसिक आरोग्य विकारांनी ग्रस्त आहेत. यावर मात करण्यासाठी ध्यान हा एक उपयुक्त मार्ग आहे. पालकांनी मुलांना ध्यान शिकवून त्यांचे मानसिक आरोग्य मजबूत करावे, असा सल्ला हे संशोधन देते.
मुलांचा मूड बदलण्याचा वेग अलिकडच्या काळात खूपच वाढला आहे. काही क्षणांपूर्वी आनंदी असणारी मुलं शुल्लक कारणांमुळे हिरमुसलेली दिसतात. खूप हट्ट करतात किंवा एकदम अबोल होतात. मुलांचा मुड चांगला राहण्यासाठी व त्यांचे मनातील भावनांवर नियंत्रण राहण्यासाठी ध्यान हा अत्यंत चांगला मार्ग ठरु शकतो.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनने २०२० प्रकाशित केलेल्या लेखामध्ये नमूद केले होते की, ध्यानामुळे किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा होते.त्यांच्या एकाग्रतेमध्येही सुधारणा झाल्याचे निदर्शनास आले.
ध्यानाचे असंख्य फायदे आहेत. मुलांनी ध्यान केल्यास ते अधिक जागृक होतात. मनाच्या सजग अवस्थेमुळे ताण-तणाव सहन करण्यांची आणि त्याचा सामना करण्याची त्यांची शक्ती वाढते.
अमेरिकेतील बाल आरोग्य परिषदेनेही ध्यानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. प्राथमिक शाळेतील मुलांनी ३ ते १० मिनिटे असे दिवसातून दोन वेळा ध्यान करावे. तर पौगंडावस्थेतील मुलांनी दररोज ५ ते ४५ मिनिटे ध्यान करणे फायदेशीर ठरते.
ध्यान शिकविण्यापूर्वी मुलांना दीर्घश्वसनाचे प्रशिक्षण देण्यात यावे, असे तज्ज्ञ सूचवितात. रात्री झोपण्यापूर्वी मुलांनी दीर्घ
श्वसन केल्यास निश्चित त्यांच्या विश्रांतीची गुणवत्ता सुधारते. तसेच मुलांना वर्गात कठीण विषयाचे प्रशिक्षण देणे आणि मैदानात खेळण्यापूर्वी दीर्घ श्वसन केल्याचा याचा लक्षणीय फायदा होतो.
मुलांचा मूड चांगला होणे व त्यांच्या एकाग्रतेमध्ये वाढ होण्यास ध्यान खूपच मदत करते. त्याचबरोबर मुलांना संगीत ऐकवणे आणि निसर्गाच्या सानिध्यात फिरायला नेणे याचाही फायदा ध्यानासारखाच होवू शकतो, असेही संशोधकांनी नमूद केले आहे.
हेही वाचा :