Reuse Of Cooked Oil
Reuse Of Cooked Oil

Reuse Of Cooked Oil: दिवाळीचे खाद्यपदार्थ तळल्यानंतर उरलेले तेल पुन्हा वापरावे का? वाचा तज्ज्ञांचे मत

Published on

पुढारी ऑनलाईन: दिवाळीचे खाद्यपदार्थ बनवून झाल्यानंतर, प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो की, उरलेल्या तेलाचे (Reuse Of Cooked Oi) करायचे काय? तुम्हालाही कधीतरी हा प्रश्न पडलाच असेल ना. काही गृहिणी हे उरलेले तेल पुन्हा भाजीआमटीला वापरतात, काहीजणी त्याच तेलात पुन्हा पुन्हा दुसरे खाद्यापदार्थात तळतात, तर काहीजणी ते सरळ फेकून देतात. महागाईच्या काळात असा काही जुगाड करत गृहिणी या तेलाची विल्हेवाट लावतातच.

पण खाद्यपदार्थ तळल्यानंतर उरलेले तेल पुन्हा स्वयंपाकात वापरल्याने याचा आरोग्यावर काय परिणाम होतो, याची काहीजणींना कल्पनादेखील नसते. तर याचा आरोग्यदायी आणि योग्य वापर कसा करायचा ते ही माहित नाही, चला तर पाहूयात या उरलेल्या तेलाच्या वापराबद्दल (Reuse Of Cooked Oi) काय म्हणतात तज्ज्ञ.

FSSAI च्या गाईडलाइननुसार, एकदा वापरलेले तेल हे शक्यतो खाण्यासाठी वापरूच नये. पण सध्याच्या महागाईत हे तेल फेकून देणेही शक्य नाही. त्यामुळे गृहिणी या तेलाचा पुर्नवापर करतात. पण आरोग्याच्या दृष्टीने हे तेल जास्तीत तीन वेळाच वापरणे शक्य आहे. एकदा पदार्थ या तेलात तळल्यानंतर तेलाचे अनेक गुणधर्म बदलतात. यामध्ये विषारी संयुगांची निर्मिती होते जी संयुगे आरोग्यासाठी हानिकारक असतात. तेलात तयार झालेल्या विषारी घटकांमुळे यकृताचा आजार, उच्च रक्तदाब, हदयासंंबंधी आजार यांसारखे भयंकर आजार होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये खाद्यपदार्थ तळल्यानंतर उरलेल्या तेलाचा (Reuse Of Cooked Oi) वापर हा टाळावाच, हे शक्य नसल्यास कमीत कमी ३ वेळा या तेलाचा वापर करता येईल.

सिद्धी जोशी (डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह इन फूड सेफ्टी वर्क्स, प्रा. लि.)

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news