गणेश उत्‍सव २०२३ : श्री सूर्याची आरती | पुढारी

गणेश उत्‍सव २०२३ : श्री सूर्याची आरती

गणेश उत्‍सव २०२३ : ‘गणेश उत्‍सव २०२३’ अवघ्‍या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी सर्वांचीच जोरदार तयारी सुरू आहे.  यानिमित्ताने उत्सवकाळातील काही महत्त्वाच्या आरती आम्ही वाचकांसाठी देत आहोत.  गणपतीच्या आरतीसह श्री सूर्याची आरती ही गणेश चतुर्थीपासून उत्‍सव काळात पूजेत म्‍हटली जाते, ही आरती पुढील प्रमाणे आहे.

गणेश उत्‍सव २०२३ : श्री सूर्याची आरती

जय जय जग-तम-हरणा दिनकर सुखकिरणा ।
उदयाचल जगभासक दिनमणि शुभस्मरणा ॥
पद्मासन सुखमूर्ती सुहास्य वरवदना ।
पद्माकर वरदप्रभ भास्वत सुखसदना ॥

जय देव जय देव जय भास्कर सूर्या ।
विधिहरीशंकररूपा जय सुर-वर-वर्या ॥धृ॥

कनकाकृतिरथ एक चक्रांकित तरणी ।
सप्ताननाश्वभूषित रथिं त्या बैसोनी ॥
योजनसहस्त्र द्वे द्वे शतयोजन दोनी ।
निमिषार्धे जग क्रमिसी अद्भुत तव करणी ॥

जय देव जय देव जय भास्कर सूर्या ।
विधिहरीशंकररूपा जय सुर-वर-वर्या ॥धृ॥

जगदुद्भवस्थितिप्रलयंकरणाद्यरूपा ।
ब्रह्म परात्पर पूर्ण तूं अद्वय तद्रूपा ॥
तत्वपदव्यतिरिक्ता अखंडसुखरूपा ।
अनन्य तव पद मौनी वंदिती चिद्रूपा ॥

जय देव जय देव जय भास्कर सूर्या ।
विधिहरीशंकररूपा जय सुर-वर-वर्या ॥धृ॥

हेही वाचलंक का?

Back to top button