Best Amboli Hill : अंबोलीत ‘हे’ नाही पाहिलं तर मग काय पाहिलं? | पुढारी

Best Amboli Hill : अंबोलीत 'हे' नाही पाहिलं तर मग काय पाहिलं?

स्वालिया शिकलगार : पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळीचा सण जव‍ळ आलाय. सणांच्या सुट्ट्याही सर्वांना मिळतील. मग एखादी ट्रीप प्लॅन करायला काय हरकत आहे. मग ‘अच्छे काम में कैसी देरी’! मग आधी आपल्या महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कड्या कपारीत वसलेल्या ठिकाणांना भेट द्या. या ठिकाणांपैकी एक आहे-अंबोली. अंबोली म्हटलं की, डोळ्यासमोर येतो तो म्हणजे तेथील ओसंडून वाहणारा धबधबा. धबधब्या शेजारचा सुंदर घाट रस्ता आणि समोरचं असणाऱ्या सह्याद्रीच्या रांगा आणि विशालकाय दरी. (Best Amboli Hill ) अजून खूप काही निसर्गाबद्दल सांगायचं आहे. येथील अनेक ठिकाणांविषयी भरभरून बोलायचं आहे. त्याचा उल्लेख विस्तीर्णपणे खाली येईलचं. ही स्टोरी वाचल्यानंतर तुम्ही नक्कीच अंबोलीचा प्लॅन कराल! (Best Amboli Hill)

सह्याद्रीच्या रांगा

अंबोली

अंबोली हे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिल स्टेशन आहे. रांगड्या महाराष्ट्रात कणखर सह्याद्रीच्या रांगामध्ये वसलेलं हे ठिकाण. मान्सूनमध्ये इथली सफर करायची म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच जणू. गार वारा, ओलेचिंब पाने, फुले, झाडे, दरीतून अंगावर येणाऱ्या पावसाच्या सरी, दाट धुकं असं सारं काही. हा पण पावसाळ्यानंतरही काही दिवस असेच वातावरण इथे राहते बरं का? त्यामु‍ळे तिथे आता जायला हरकत नाही. कारण, असाच निसर्ग अद्यापही डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे.

अंबोली धबधबा

हिरवागार निसर्ग, अंगावर शहारा आणणारा वारा, पक्ष्यांचा किलबिलाट, सळसळत्या पानांचा आवाज आणि खास म्हणजे येथील प्राणीसंपदा. अंबोलीच्या घाटात हा प्रसिद्ध अंबोली धबधबा आहे. खास फोटोशूटसाठी असंख्य पर्यटक धबधबा पाहण्यासाठी जातात. विशेष म्हणजे इथे खूप सारी माकडं तुमच्या स्वागतासाठी हजर असतात. घाटाच्या कडेला छोटे -छोटे पत्र्याचे शेड किंवा पाल मारलेले दिसतात. येथे बसून गरमागरम चहा, कांदे भजी, मिरची भजी, वडा पाव, मिसळ, डोसा, अंबोळी अशा पदार्थांवर ताव मारता येतो. यासाठी कोकण किंवा गोव्याकडे जाणारे पर्यटक अंबोला घाटात हमखास थांबतात.

नांगरतास धबधबा

एका अरूंद दरीत हा धबधबा आहे. अंबोलीपासून १० किमी. अंतरावर हे ठिकाण आहे. येथे धनगर बांधवांचे छोटेखानी मंदिर आहे. सुमारे २०० फूट खोल दरीतून या धबधब्याचा प्रवाह पुढे जातो.

महादेवगड

अंबोलीत गेल्यानंतर उजव्या बाजूला एक जंगलातून कच्चा रस्ता गेला आहे. तेथून ३-४ किमी. अंतरावर महादेवगड आहे. महादेवगडचे दृश्य न्याहाळण्यासाठी उंचीवर थांबण्यासाठी आणि बैठकीसाठी व्यवस्था करण्यात आलीय. येथून महादेवगड आणि सह्याद्रीच्या रांगा जणू पृथ्वीवरचा स्वर्गच. मस्त झुळझुळणारा वारा, महादेवगडाच्या कपारीतून वर आलेला सूर्य, घनदाट जंगल आणि नीरव शांतता अनुभावायला जायचं असेल तर महादेवगडाला नक्की भेट द्यायला हवी.

शिरगावकर पॉईंट

येथून निसर्गाचा सुंदर नजारा पाहता येतो. तसेच सनराईज आणि सनसेटचे सुंदर दृश्य पाहता येते. नेचर फोटोग्राफर्ससाठी हे ठिकाण एखादा खजानाच आहे. अंबोलीतील बस स्टॉपपासून हे अंदर ३ किमी. आहे.

हिरण्यकेशी नदीचा उगम आणि मंदिर

हिरण्यकेशी मंदिर भक्तांसाठी खूप प्रसिध्द आहे. हे मंदिर गुहांच्या मध्ये आहे. येथूनचं हिरण्यकेशी नदीचा उगम आहे. हा उगम डोळ्यांनीपाहता येतो, हे भाग्यच म्हणावे लागेल. सुंदर अशा या मंदिराभोवती घनदाट जंगल आणि हिरवीगर्द वनराई आहे. मंदिराच्या समोर एक तळे आहे. नदीचे प्राणी येऊन प्रवाहित होऊन पुढे जाते. हिण्यकेशी हे ठिकाण पाहम्यासारखे असून ते अंबोली एसटी स्टॅण्डपासून ५ किमी. अंतरावर आहे. येथे वर्षभर भक्तगणांची गर्दी असते.

सनसेट पॉईंट

अंबोलीच्या घाटात नागमोडी वळणांमध्ये बाजूलाच खोल दरीत हिरवागार शालू पांघरलेले दाट जंगल दिसते. रस्त्याच्या बाजूला काही ठिकाणी सनसेट पॉईंट्स आहेत. येथे गाड्या थांबवण्यासाठी व्यवस्थाही आहे. या पॉईंटवरून सनसेट पॉईंट पाहता येतो.

परिक्षित पॉईंट

येथे तुम्ही ट्रेकला जाऊ शकता तसेच नाईट कॅम्पिंगदेखील करू शकता.

कावळेसाद धबधबा

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून अंबोलीला ओळखले जाते. आंबोली जवळील गेळे गावात कावळेसाद पॉईंट  नावाचा धबधबा आहे. याचे वैषिष्ट्य म्हणजे या ठिकाणीचा उलट्या दिशेने वाहणारा धबधबा.  जेव्हा कावळेसादच्या दरीमध्ये पाणी कोसळतं, तेव्हा दरीतून येणाऱ्या जोरदार वाऱ्यामु‍ळे ते पाणी पुन्हा वर येतं. या बाजूला चिंब भिजण्यासाठी लोक येतात आणि भिजण्याचा आनंद घेतात.

रामतीर्थ धबधबा

हिरण्यकेशी नदीला पाणी आल्यानंतर रामतीर्थ धबधबा प्रवाहित होतो. आजरा तालुक्यातील हा धबधबा अनेक पर्यटकांना भूरळ घालणारा आहे.

कसे जाल अंबोलीला?

कोल्हापुरातून जायचे असल्यास: कोल्हापूर-गोकूळ शिरगाव-कागल-उत्तूर-आजरा-अंबोली
पुणे-बंगळूर हायवे – निपाणी – आजरा मार्गे आंबोली
मुंबई-गोवा महामार्ग सावंतवाडीमार्गे आंबोली

काय खाल?

घावण, चहा, गरमागरम भजी, अस्सल कोकणी मेवा, मालवणी जेवण, चुलीवरची भाकरी, सोलकढी, माशांचे कालवण, बांगडा थाळी, कोंबडी वडे, तांदळाची भाकरी, तांदळाचे मोदक, शिरोळे, नाचणी भाकरी.

बाबा धबधबा

बाबा धबधबाबाबा धबधबा, राघवेश्वर पॉइंट, रांगणा किल्ला, दुर्ग ढकोबा ट्रेक, पुढे सावंतवाडी -लाकडी खेळण्यांचा बाजार अशा ठिकाणांनाही भेट देता येईल.

बाबा धबधबा

Back to top button