पुढारी ऑनलाईन डेस्क : 'आम्ही किती प्रयत्न करतो. खाणेही कमीच आहे तरीही वजनच कमी होत नाही,' असा सूर अलिकडे अनेकांकडून ऐकायला मिळतो. कोरोनानंतर वर्क फॉर्म होम या संकल्पनेतून वजन वाढीला कारणीभूत ठरल्याचेही मानले जाते. वजन कमी करणे ही एक खूपच कठीण आणि आव्हानात्मक टास्क ठरते. त्यामुळेच ऑनलाइन ब्रोकरेज कंपनी Zerodha च्या सीईओंनी वजन कमी करायचे चँलेज देत कंपनीतील कर्मचार्यांना तब्बल १० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. ( weight loss )
वजन कमी करण्याच्यव चॅलेंजबाबत सांगताना सीईओ नितीन कामत यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "आमच्या कंपनीतील कर्मचारी हे वर्कफॉर्म होम काम करतात. त्यांनी आपल्या शरीराची काळजी घ्यावी, यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आम्ही त्यांना एक नवीन फिटनेस चॅलेंज दिली आहे. जो आम्ही दिलेले चॅलेंज पूर्ण करेल त्याला १० लाख रुपयांचे बक्षीस देणार आहोत."
आमचे कर्मचारी वर्क फॉम्र होम करतात. एका जागी नुसतेच बसून राहणे हे नवीन धुम्रपानाचा प्रकार आहे. आता कोरोनाचे संकट कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कर्मचार्यांना शारीरिकदृष्ट्या जागृत करत आहोत. वजन कमी करण्याचे चॅलेंज स्वीकारणार्या कर्मचार्यांनी दररोज किमान ३५० कॅलरी बर्न करण्याची अट आहे. ९० दिवस ही अट पूर्ण करुन जो कर्मचारी वजन कमी करेल त्याला १० लाखांच्या बक्षीसांसह एक महिन्याचा पगार दिला जाईल. या नव्या टास्कमुळे कर्मचारी स्वत:सह कुटुबांतील सदस्यांच्याही आरोग्याची काळजी घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा :