Sleep alart : कमी झोप तुम्हाला अधिक स्वार्थी बनवू शकते; जाणून घ्या सविस्तर | पुढारी

Sleep alart : कमी झोप तुम्हाला अधिक स्वार्थी बनवू शकते; जाणून घ्या सविस्तर

पुढारी ऑनलाईन: कमी झोप, झोपेचे प्रमाण आणि गुणवत्ता यांचया परिणाम तुमच्या स्वभावावर देखील होऊ शकतो. तुमची झोप पूर्ण झाली नसेल, तर तुमचा स्वभाव हा अधिक स्वार्थी बनू शकतो, असे एका संशोधनात नमूद करण्‍यात आले आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठात याविषयी संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनात असे दिसून आले आहे की, कमी झोप ही व्यक्तीच्या एकमेकांना मदत करण्याच्या सुसंस्कृत स्वभावाला बाधित ठरते. ( Sleep alart )

एकमेकाला मदत करणे हे मनुष्याचे सुसंस्कृतप‍‍‍णाचे लक्षण आहे; पण कमी झोप तुम्हाला अधिक स्वार्थी बनवू शकते, असे या संशोधनात स्पष्ट झाले आहे. कमी आणि दर्जेदार झोप झाली नाही तर  केवळ मानसिक आरोग्याचा धोका वाढवत नाही तर, इतर आजारांना देखील आमंत्रण मिळते . तसेच समाजात वावरतानासुद्धा याचा परिणाम दिसू लागतो. ( Sleep alart )

झोपेच्या कमतरतेचा संबंध हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे विकार, नैराश्य, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि एकूण मृत्यूच्या जोखमीशी जोडला गेला आहे. तथापि, या नवीन निष्कर्षांवरून असे दिसून येते की, झोपेची कमतरता देखील आपल्या मूलभूत सामाजिक विवेकाला क्षीण करते. ज्यामुळे आपली इतरांना मदत करण्याची आपली इच्छा कमी होते, असेही या संशोधनात नमूद कर‍‍ण्यात आले आहे.

हेही वाचा:

 

Back to top button