पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रावण महिना आला की, श्रावण घेवडा आपल्या ताटात हमखास येतो. याच कारण, असं की श्रावण महिन्यात घेवड्याचं पीक जास्त येतं. मंडळी खरंतर हे पीक अमेरिकेतलं. पण, महाराष्ट्रात कसं आलं याचा इतिहास माहीत नाही. असो, आपल्याला काय? आपण श्रावण घेवडा मटकीची खमंग भाजी (Veg recipe) कशी तयार करतात ते पाहू… चला लागा तयारीला तर…
श्रावण घेवडा-मटकीची भाजी करण्याचं साहित्य
अर्धा किलो कोवळा श्रावण घेवडा, पाव किलो मोड आलेली मटकी, १ किलो डाव तेल, फोडणीचे साहित्य, १ चमचा लाल तिखट, १ चमचा काळा मसाला, मूठभर सुखे खोबरे, १ चमचा जिरे भाजून कुटून घ्या, चवीनुसार मीठ व गूळ, पाव वाटी खवलेला नारळ आणि मूठभर चिरलेली कोथिंबीर.
श्रावण घेवडा-मटकीची कशी तयार कराल भाजी?
१) श्रावण घेवड्याचे डेख आणि शिरा खोडून, बारीक किंवा मध्यम चिरून घ्या. तसेच त्याला धुवून निथळून घ्या.
२) त्यानंतर मोड आलेली मटकी निवडून घ्या आणि धुवून घ्या.
३) डावभर तेलात हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी द्या. त्यात चिरलेला घेवडा आणि मटकी घाला.
४) त्यावर पाण्याचे झाकण घालून १ वाफ द्या.
५) मटकी बोटचेपी झाली की, लाल तिखट, काळा मसाला, कुटलेले जिरे-खोबरे, चवीनुसार मीठ, गूळ घालावे.
५) त्यानंतर १ वाटी पाणी घालून भाजी शिजवा.
६) शेवटी ओला नारळ आणि कोथिंबीर घालून अंगाबरोबर ठेवून भाजी खाली उतरवा.
श्रावणात घेवड्याचं एवढं महत्व का?
श्रावण महिना हा केवळ शाकाहारी (Veg recipe) असतो. या महिन्यात मांसाहारी पदार्थ केले जात नाहीत. याच महिन्यात घेवडा मोठ्या प्रमाणात पिकतो. इतकंच नाही, तर ही घेवडा-मटकीची भाजी मंगळागौरीला करण्याची प्रथा आहे. त्यामुळे श्रावणघेवडा-मटकीच्या भाजीला जास्त महत्व आहे.
ही रेसिपी कशी करतात हे पाहिलं का?
या रेसिपीदेखील वाचा