पुढारी ऑनलाईन डेस्क : शिलाजीत (Shilajit) म्हंटलं की, लैंगिक ताकद वाढविण्याचं औषध, अशा एक साधारण समज आहे. पण, इतकाच त्याचा फायदा नाही. शिलाजीत मानवी शरीराच्या अनेक व्याधींना दूर करण्यासाठीदेखील उपयुक्त आहे. कारण, त्यामध्ये ८६ प्रकारचे खनिज तत्वं सापडतात. शिलाजीत इकतं महाग असतं की, १० ग्रॅम शिलाजीतची किंमत ही ६०० रुपये इतकी असते. तर आरोग्यासाठी इतकं फायद्यांचं असणारं शिलाजीत नेमकं मिळवतात कसे? त्याची प्रक्रिया कशी असते? यावर थोडक्यात नजर टाकू…
…असं मिळवलं जातं शिलाजीत
शिलाजीत (Shilajit) हा पाकिस्तानमधील उंच पर्वतांमध्ये असणाऱ्या गुहांमध्ये सापडतो. चार-पाच अनुभवी लोकांचा समूह पर्वतांमध्ये असणाऱ्या शिलाजीतला शोधण्यासाठी घरातून बाहेर पडतात. हा शोध कधी-कधी काही तासांचाच असतो, तर काही दिवसांचाही असतो. एक माणूस नाष्टा-जेवण तयार करण्यासाठी असतो, तर बाकीचे लोक डोगंरावर रस्सी बांधतात आणि मजबुतीने पकडतात. त्यानंतर त्या रस्सीच्या साह्याने एक व्यक्ती डोगंरातील गुहेमध्ये उतरतात.
या गुहा शोधण्यासाठी दुर्बिणींचा वापर करतात. त्यानंतर हा माणसांचा शोध उंच डोंगरावर चढतो. त्यांना विशिष्ट प्रकारचा वास आला की, ते गुहेत प्रवेश करतात. एका पोत्यामध्ये तो शिलाजीत काढून घेतला जातो. नंतर तो शिलाजीतने भरलेले पोतं रस्सीच्या साह्याने खाली पाठवलं जातं आणि नंतर तो गुहेतील व्यक्ती बाहेर पडतो. पण, हे काम इतकं रिस्की असतं की, रस्सी तुटून माणसांचा जीवदेखील जाऊ शकतो.
शिलाजीतवर प्रक्रिया कशी केली जाते?
२० वर्षांपासून शिलाजीत (Shilajit) काढण्याचं काम करणारे अनुभवी माणसं सांगतात की, ज्या दगडांमध्ये शिलाजीत असतं, ते दगड आणून त्याचे छोटे-छोटे तुकडे केले जातात. नंतर ते तुकडे बाटलीत टाकून त्यांना ठराविक प्रमाणात पाणी टाकून ते पाणी चमच्याने हलविले जाते. कारण, त्यातून पाण्यामध्ये शिलाजीत एकरूप होते. हे पाणी एक आठवडा बंद करू ठवले जाते. नंतर ते पाणी पूर्णपणे काळ्या रंगाचे होते, त्याचा अर्थ असा की, शिलाजीत दगडामधून बाजूला होत पाण्यात व्यवस्थितरित्या विरघळे, याची खात्री होते.
त्यानंतर हे पाणी एका काचेच्या बाटलीत टाकले जाते. उन्हाच्या साह्याने ते पाणी अटवले जाते. पुन्हा-पुन्हा पाणी टाकून ते पाणी अटवले जाते. ही प्रक्रिया एक महिना चालते. त्यानंतर शिलाजीत बाजूला करून दुकानांमध्ये विक्रीला पाठवले जाते. पण, त्यापूर्वी मेडिकल टेस्टदेखील केली जाते. त्यातून तयार करण्यात आलेल्या शिलाजीतमध्ये ८६ प्रकारचे खनिज तत्वे आहेत की, नाही हे तपासले जाते. त्यातून त्याचा मेडिकल तपासणीचे प्रमाणपत्र मिळते.
शिलाजीतचा फायदे कोणते आहेत?
१) शिलाजीच वायग्रासारखे काम करते, असा एक गैरसमज आहे. पण, शिलाजीत हे मानवी शरीरातील खनिजतत्वांची कमी भरून काढते. शिलाजीत घेतल्यानंतर शरीराचे तापमान वाढते. रक्तसंचार वेगाने होऊ लागतो. याचा अर्थ असा नाही की, तो वायग्रासारखं काम करतो.
२) आयर्न, झिंक, मॅग्नेशिअम, यांसारखे ८५ खनिजत्वे सापडतात. त्यामुळे रक्तसंचार वाढतोच, त्याचबरोबर प्रतिक्रारशक्ती वाढते.
३) मानवी शरीरातील अनेक व्याधींपासून शिलाजीतमुळे मुक्ती मिळू शकते. जसं की, अल्जाइमर, डिप्रेशन आणि मेंदू रोगांसाठी त्याचा वापर फायदेशीर आहे. इतकंच नाही, शूगर लेवलही नियंत्रित ठेवण्यासाठी फायद्याची आहे.
शिलाजीत 'या' विकाराच्या लोकांनी घेऊ नये
रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांनी शिलाजीत अजिबात घेऊ नये. कारण, शिलाजीतमध्ये असणाऱ्या ८६ खनिज घटकांमुळे माणसांचा रक्तदाब थोडा वाढतो. ज्यांना पूर्वीपासून रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांचा रक्तदाब आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हृदयविकाराच्या लोकांनाही शिलाजीतचं सेवन टाळावं.
पहा व्हिडीओ : अपघातग्रस्तांची जीवन रक्षक १०८ अम्ब्युलन्स