Anand Mahindra Video : आनंद महिंद्रांनी सांगितले सुखी जीवनाचे रहस्य… ‘या’ व्हिडिओचा दिला संदर्भ

Anand Mahindra Video : आनंद महिंद्रांनी सांगितले सुखी जीवनाचे रहस्य… ‘या’ व्हिडिओचा दिला संदर्भ

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. बऱ्याचदा मजेदार आणि प्रेरणादायी असे काही व्हिडिओ आणि फोटो ते आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असतात. अनेकवेळा ते आपल्या व्हिडिओ आणि चित्रांच्या माध्यमातून लोकांच्या जीवनाशी निगडित अनेक रहस्ये सांगू पाहताना दिसतात. याशिवाय ते अनेकदा काही जुगाडविषयक आणि व्यवसायाशी संबंधित व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर करतात. (Anand Mahindra Video)

महिंद्रांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहिल्यानंतर जीवनाचा आनंद कसा घ्यावयाचा हे समजेल. हा व्हिडिओ एका स्कूटरचा आहे. ही स्कूटर एका पेट्रोल पंपावर उभी आहे. जी अगदी आकर्षकरित्या सजवलेली पहायला मिळते. रंगीबेरंगी लाईट्स यासाठी वापरलेल्या आहेत. या स्कूटरचा संदर्भ देत त्यांनी मानवाचे जगणे कसे असावे याविषयीचे विचार फोटोंद्वारे मांडलेले दिसून येतात. आयुष्यात अनेक सुख दु:खांची चढाओढ कशी असते हे या स्कूटरच्या लाईटवरून दिसून येते. (Anand Mahindra Video)

काय म्हणतात आनंद महिंद्रा स्कूटरबद्दल

आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक गाणे वाजत असताना दिसून येत आहे. स्कूटरच्या हँडलमध्ये राजेश खन्ना यांचे 'छुप गये सारे नजारे' हे गाणे वाजत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. हे गाणे मोबाईलवरून लावलेले आहे.

सोशल मीडियावर ही व्हिडिओ शेअर केल्यापासून जवळपास 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओ क्लिपला चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. त्यापैकी बहुतेकांना स्कूटर डिझाईन करणाऱ्या व्यक्तीची सर्जनशीलता आवडते. एका यूजरने प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, "ही सर्जनशीलता आहे, ही प्रतिभा पुढे नेली पाहिजे." दुसर्‍या एका चाहत्याने "बाईक थिएटर" अशी टिप्पणी केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news